म्हाडाच्या लॉटरीसाठी १८ हजार अर्ज : १६ डिसेंबरला लागणार निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 06:45 AM2018-11-10T06:45:44+5:302018-11-10T06:46:17+5:30

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १ हजार ३८४ घरांच्या लॉटरीसाठी शुक्रवारी साडेसहा वाजेपर्यंत १७ हजार ७९५ अर्ज दाखल झाले.

 18,000 applications for lotteries for MHADA: Decision on Dec 16 | म्हाडाच्या लॉटरीसाठी १८ हजार अर्ज : १६ डिसेंबरला लागणार निकाल

म्हाडाच्या लॉटरीसाठी १८ हजार अर्ज : १६ डिसेंबरला लागणार निकाल

Next

मुंबई - म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १ हजार ३८४ घरांच्या लॉटरीसाठी शुक्रवारी साडेसहा वाजेपर्यंत १७ हजार ७९५ अर्ज दाखल झाले. १० हजार ८७५ अर्जदारांनी या लॉटरीसाठी आॅनलाईन नोंदणी पूर्ण केली आहे. संकेतस्थळ वापरणाऱ्यांची संख्या ५० हजारांच्या आसपास असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे. कोकण मंडळाच्या लॉटरीला अत्यल्प प्रतिसादा मिळाला होता, त्या तुलनेत मुंबई मंडळाला आॅनलाईन लॉटरीत अर्जदारांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
मुंबई मंडळातील आॅनलाईन लॉटरी नोंदणीला ५ नोव्हेंबरला दुपारी २ वाजल्यापासून सुरवात झाली आहे. गेल्या ४ दिवसात १३८४ घरांसाठी अर्जदारांनी सकारात्मक चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. म्हाडाने ग्रँटरोड सारख्या ठिकाणी ५ करोड रूपयांची महागडी घरे जरी विक्रीला ठेवली असली तरी अश्या महागड्या घरांना सोडून मुलुंडमधील गव्हाणपाडा, सायनमधील प्रतीक्षानगर, बोरिवली आणि चांदवली मधील अत्यल्प २२ आणि अल्प गटातील घरांना आॅनलाईन लॉटरीत चांगला प्रतिसाद मिळत आहे़
म्हाडाने यावर्षी लॉटरीतील घरांसाठी किंमतीचे नवीन धोरण तयार केले आहे. घरांच्या किमती या वर्षी २५ ते ३० टक्क्यांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे अल्प आणि अत्यल्प गटात मोडणाºया अर्जदारांना याचा मोठा फायदा झाला आहे. या लॉटरीची आॅनलाईन अर्जासाठी नोंदणीची अंतिम तारीख १० डिसेंबरपर्यंत आहे. १६ डिसेंबरला म्हाडाच्या १३८४ घरांची लॉटरी फुटणार आहे.
 

Web Title:  18,000 applications for lotteries for MHADA: Decision on Dec 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.