२0१८ मधील विविध दुर्घटनांत १५३ मुंबईकरांचा मृत्यू तर ५९९ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 02:24 AM2019-06-04T02:24:40+5:302019-06-04T06:27:57+5:30

विशेषत: पावसाळ्यात आपत्कालीन घटना घडण्याचे प्रमाण अधिक असून, अशा दुर्घटनांमध्ये नागरिक मृत्युमुखी पडण्यासह जखमी होण्याचे प्रमाण अधिक आहे

153 killed and 99 injured in various accidents in 2018 | २0१८ मधील विविध दुर्घटनांत १५३ मुंबईकरांचा मृत्यू तर ५९९ जखमी

२0१८ मधील विविध दुर्घटनांत १५३ मुंबईकरांचा मृत्यू तर ५९९ जखमी

Next

मुंबई : मुंबई शहराला ‘हादसों का शहर’ असे म्हटले जाते. येथे सातत्याने काही ना काही दुर्घटना घडत असतात. अशा दुर्घटनांमध्ये सातत्याने अनेकांचे नाहक बळी जात आहेत़ देशाच्याआर्थिक राजधानीत २०१८ साली घडलेल्या १० हजार ६८ आपत्कालीन घटनांत १५३ जणांचा मृत्यू झाला आहे़ ५९९ जण जखमी झाले आहेत.

विशेषत: पावसाळ्यात आपत्कालीन घटना घडण्याचे प्रमाण अधिक असून, अशा दुर्घटनांमध्ये नागरिक मृत्युमुखी पडण्यासह जखमी होण्याचे प्रमाण अधिक आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे २०१८ साली घडलेल्या आपत्कालीन घटनांसह या घटनांत किती जणांचा मृत्यू झाला, किती जण जखमी झाले? याबाबत माहिती विचारली होती. यावर आपत्कालीन व्यस्थापन विभागाचे जनमाहिती अधिकरी तथा उप प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे यांनी शेख यांना दिलेल्या कागदपत्रांतून ही माहिती समोर आली आहे. आपत्कालीन घटनांमध्ये झाडे - झाडांच्या फांद्या पडणे, दरड कोसळणे, घरांसह इमारतींचे भाग कोसळणे, आग लागणे, गॅसगळती, रस्त्यावर ऑइल सांडणे, समुद्र, नाला, नदी, विहीर, खाडी, खदानसह मॅनहोलचे अपघात आणि इतर अपघातांचा समावेश होतो.

झाडे कोसळली
३ हजार १६९ झाडे कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. यात ४ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. एकूण ३० जखमी झाले. यात १८ पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे.

जल दुर्घटना
समुद्र, नाला, विहीर, खाडी, खदानसह मॅनहोलसंबंधी १ हजार २५८ दुर्घटना घडल्या. यात ७६ जणांचा मृत्यू झाला. यात ६५ पुरुष आणि ११ महिला आहेत. ३१ जण जखमी झाले. यात १६ पुरुष आणि १५ महिला आहेत.

गॅसगळती
२९७ गॅसगळतीच्या दुर्घटना घडल्या. १४ जण जखमी झाले. यात १३ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

गेल्या वर्षभरात ६ जणांना मृत्यू
जानेवारी ते डिसेंबर, २०१८ मध्ये एकूण ३,१६९ झाडे / झाडांच्या फांद्या पडण्याची घटना घडल्या. या घटनांमध्ये एकूण ६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ४ पुरुष आणि २ स्त्रियांचा समावेश आहे. वर्षभरात एकूण ३० जण जखमी झाले, त्यामध्ये १८ पुरुष आणि १२ स्त्रियांचा समावेश आहे.

आगीच्या दुर्घटना
३ हजार ९३० आगीच्या दुर्घटना घडल्या. ४६ जणांचा मृत्यू झाला. यात २७ पुरुष आणि १९ महिलांचा समावेश आहे. ३३८ जण जखमी झाले. यात २४४ पुरुष आणि ११४ महिला आहेत.

बांधकाम कोसळले
६१९ बांधकामांचा भाग कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. यात १२ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. ७९ जण जखमी झाले असून, यात ६० पुरुष आणि १९ महिला आहेत.

Web Title: 153 killed and 99 injured in various accidents in 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई