कुंभमेळ्याला १२ कोटी भाविक हजेरी लावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 01:26 AM2019-01-04T01:26:29+5:302019-01-04T01:27:07+5:30

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १५ जानेवारी रोजी आयोजित कुंभमेळ्याला १२ कोटी भाविक हजेरी लावतील, असा अंदाज उत्तर प्रदेशचे शहरविकास मंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी व्यक्त केला आहे.

 12 million pilgrims will attend the Kumbh Mela | कुंभमेळ्याला १२ कोटी भाविक हजेरी लावणार

कुंभमेळ्याला १२ कोटी भाविक हजेरी लावणार

Next

मुंबई : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १५ जानेवारी रोजी आयोजित कुंभमेळ्याला १२ कोटी भाविक हजेरी लावतील, असा अंदाज उत्तर प्रदेशचे शहरविकास मंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी व्यक्त केला आहे. मौनी अमावस्येला ३ कोटी भक्त, तर १५ जानेवारी ते ४ मार्चदरम्यान दररोज २० लाख भक्त हजेरी लावणार आहेत. यात १० लाख विदेशी पर्यटकांचाही समावेश असणार आहे, असे खन्ना म्हणाले.
महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांचे उत्तर प्रदेश सरकार स्वागत करेल. प्रयागराज येथे होणारा कार्यक्रम हे आकर्षण स्थान असून देशातच नव्हे, तर परदेशातही याबाबत उत्सुकता दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे युनेस्कोतर्फे कुंभमेळ्याची गणना ‘मानवी संस्कृतीतील अद्वितीय सांस्कृतिक वारसा’ या यादीत केली गेली, अशी माहिती खन्ना यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी सीआयआय महाराष्ट्र राज्य समितीचे माजी संचालक सुनील खन्ना, उत्तर प्रदेश सरकारचे शहर विकास विभागाचे विशेष सचिव संजय कुमार उपस्थित होते.
देशाच्या प्रत्येक भागातून जास्तीतजास्त भाविकांनी कुंभमेळ्याला हजेरी लावावी, यासाठी राज्य सरकार विविध राज्यांतील लोकांचे स्वागत करीत आहे. देशातल्या प्रत्येक संस्कृतीचे प्रातिनिधिक दर्शन या मेळ्यात घडून येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यपदार्थ, महोत्सव, पुरातन संस्कृतीचा वारसा यंदा प्रयागराजमध्ये दाखविला जाणार आहे. प्रयागराज येथे नवीन हवाई नागरी टर्मिनल उभारल्यामुळे या भागात येणाºया पर्यटकांची गर्दी वाढवणार आहे. बंगळुरू, इंदौर, नागपूर, पटना ही शहरे प्रयागराज शहराशी हवाई मार्गाने जोडली गेली आहेत.

२०० कार्यक्रम
प्रत्येक संस्कृतीचे प्रतिनिधित्व व्यवस्थित पार पडावे, यासाठी ३० थिमॅटिक गेट उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी २०० हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. यात सांस्कृतिक विषयांवरील कार्यक्रम, खाद्यजत्रा, वेंडिंग झोन, प्रदर्शने, पर्यटकांसाठी वॉक असे विविध कार्यक्रम अंतर्भूत असतील. काही महत्त्वाच्या भागात सुशोभीकरणासाठी रोषणाईही करण्यात आली आहे. भारतीय संस्कृती दाखविण्यासाठी ‘कला ग्राम’ आणि ‘संस्कृती ग्राम’ही उभारण्यात आले आहे.

Web Title:  12 million pilgrims will attend the Kumbh Mela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.