आज मुळचे मुंबईकर रेल्वेमंत्री करणार नव्या घोषणा... एलफिन्स्टन अपघाताबाबत काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 04:53 AM2017-09-28T04:53:04+5:302017-09-29T12:26:18+5:30

एलफिन्स्टन परळ स्थानकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांनी प्राण गमावले आहेत.. मुंबईच्या रेल्वेची अवस्था अत्यंत भीषण असून मुळचे मुंबईकर असलेले रेल्वे मंत्री पियुष गोयल काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे...

100 new flyovers for local passengers Railway Minister's announcement, 'good day' for travelers | आज मुळचे मुंबईकर रेल्वेमंत्री करणार नव्या घोषणा... एलफिन्स्टन अपघाताबाबत काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष

आज मुळचे मुंबईकर रेल्वेमंत्री करणार नव्या घोषणा... एलफिन्स्टन अपघाताबाबत काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष

Next

मुंबई : मुंबईकर प्रवासी अक्षरश: जीव मुठीत धरून रोज रेल्वेने प्रवास करत असतात. मुंबईकर सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाल्यावर तरी परिस्थिती बदलेल असं वाटलं पण काही झालं नाही. आताचे रेल्वेमंत्री पियुष गोयलही मुळचे मुंबईकर आहेत. आजच नेमके ते मुंबईत नव्या घोषणा करणार आहेत. ते म मुुंबईत असतानाच एलफिन्स्टन - परळची दुर्घटना घडली आहे. या सगळ्यांवर रेल्वेमंत्री काय भाष्य करतात आणि मुंबईकरांसाठी काय देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

काय पदरात पडणार मुंबईकरांच्या...

उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी आॅक्टोबरपासून लोकल प्रवास सुलभ होण्याची चिन्हे आहेत. हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर प्रत्येकी १४ फे-या वाढणार आहेत. तर मध्य मार्गावर १६ फे-यांची वाढ होण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे शुक्रवार, २९ सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या वेळी ते १०० लोकल फेऱ्यांची घोषणा करणार आहेत. आॅक्टोबरपासून हार्बरवर नवीन फेºया सुरूहोणार आहेत. मात्र मध्य मार्गावरील प्रवाशांना वाढीव फेºयांसाठी नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
मुंबई उपनगरीय सेवेत सध्या २,९८३ लोकल फेºया सुरू आहेत. यापैकी मध्य रेल्वेवर १,६६० लोकल फेºया होतात. उपनगरीय रेल्वेमार्गावर तब्बल ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. परिणामी, रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी फेऱ्या वाढवण्याची चर्चा बरेच दिवस रेल्वे वर्तुळात रंगत होती. लोकल फेºया वाढवण्यासाठी अनेक रेल्वे स्थानकांवर वेळप्रसंगी रेल रोकोही करण्यात आला होता. त्यामुळेच अखेर वाढीव लोकल फेऱ्या सुरू करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
नवनियुक्त रेल्वेमंत्री पीयूष गोयल मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर १०० लोकल फेºयांची घोषणा करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. यापैकी ६८ लोकल फेऱ्या (यातील हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर प्रत्येकी १४ फेऱ्या) या मध्य मार्गावर आणि ३२ लोकल फेऱ्या या पश्चिम रेल्वेमार्गावर होतील. हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरील प्रत्येकी १४ फेऱ्या १ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मध्य मार्गावरील वाढीव १६ फेऱ्या १ नोव्हेंबरपासून सुरू होतील. उर्वरित लोकल फेऱ्या जानेवारी २०१८मध्ये सुरू होण्याची शक्यता रेल्वे सूत्रांनी वर्तवली आहे.

रेल्वेमंत्री येती ‘सीएसएमटी’दारा...
रेल्वेमंत्री पीयूष गोयल २९ तारखेला मुंबई दौºयावर येणार आहेत. यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासन चांगलेच कामाला लागले आहे. प्रत्येक अधिकाºयाच्या ‘ड्युटी’वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील रेल्वे मुख्यालयाच्या इमारतीला पायºयांवर रेड कार्पेट अंथरण्याच्या कामासदेखील वेग आला आहे. परिणामी, दसरा सणाच्या आधीच मध्य रेल्वेवर रेल्वेमंत्र्यांच्या आगमनामुळे सणासुदीसारखी तयारी करण्यात येत आहे.

१०० लोकल फेऱ्यांपैकी मध्य मार्गावरील २४ लोकल फेऱ्या या जानेवारी २०१८मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. उर्वरित ७६ लोकल फेऱ्यांचा तपशील पुढीलप्रमाणे
मार्ग फेºया कधीपासून
मध्य १६ १ नोव्हेंबर
हार्बर १४ १ आॅक्टोबर
ट्रान्स हार्बर १४ १ आॅक्टोबर
पश्चिम ३२ १ आॅक्टोबर

Web Title: 100 new flyovers for local passengers Railway Minister's announcement, 'good day' for travelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.