Women's Day 2018: 41% of the women in the country are not led by women | Women's Day 2018 : देशातील ४१% उद्योग महिलांच्या नेतृत्वाविना  
Women's Day 2018 : देशातील ४१% उद्योग महिलांच्या नेतृत्वाविना  

मुंबई -  देशातील ४१ टक्के उद्योग व कंपन्यांमध्ये महिलांचे नेतृत्व नाही. महिलांना उद्योगात नेतृत्व देण्यात भारताचा क्रमांक जगात शेवटून तिसरा आहे. ग्रँड थॉरटॉन या संस्थेचा हा अहवाल महिला दिनाच्या निमित्ताने महत्त्वाचा आहे. संस्थेने भारतातील ५,५०० उद्योगांमधील महिला प्रतिनिधित्वाचा अभ्यास केला. त्यामध्ये वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर महिलांचे प्रतिनिधित्व अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे.
देशभरातील कंपन्यांमधील सीईओ किंवा व्यवस्थापकीय संचालकांमध्ये केवळ ७ टक्के महिला आहेत. याच श्रेणीत भारताचा क्रमांक जगात शेवटून तिसरा आहे. भारतातील विविध कंपन्यांमध्ये सर्वाधिक महिला या मनुष्यबळ विकास किंवा प्रशासकीय प्रमुख पदापर्यंतच कार्यरत आहेत. त्यांची टक्केवारीही अनुक्रमे फक्त २५ व १८ इतकी कमी आहे. पेप्सीच्या इंदिरा नुई असतील किंवा आयसीआयसीआयच्या चंदा कोचर यासारख्या महिलांनी उद्योग विश्वात वेगळी छाप पाडली आहे. स्टेट बँकेच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांचाही कार्यकाळ बँँकिंग क्षेत्रासाठी उल्लेखनीय ठरला. आर्किटेक्चर क्षेत्रातील लुईस बर्जर या आंतरराष्टÑीय कंपनीच्या आशिया मुख्य आॅपरेटिंग अधिकारी (सीओओ) पदावर भारतीयच शेफाली सक्सेना या महिला आहेत, पण अशी ही
उदाहरणे केवळ मोजकीच असल्याचे चित्र ग्रँड थोरटॉनच्या अहवालातून दिसून येते.

आता रंगकामातही महिलांचा सहभाग

- देशातील एकूण मनुष्यबळात ३० टक्के महिला आहेत. मात्र, सुतार, गवंडी किंवा रंगकाम यासारखी क्षेत्रे पूर्णपणे पुरुषांच्या वर्चस्वाखाली आहेत.
- या क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व मात्र फक्त १ टक्का आहे. शिक्षणापासून वंचित असणाºया महिलांसाठी रंगकामासारखे क्षेत्र मिळकतीचे प्रमुख साधन ठरते.
- यासाठीच बिर्ला व्हाइट सिमेंटने पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत १६० महिलांना या कामासाठी तयार केले असून, या वर्षभरात ३०० महिलांना प्रशिक्षित केले जाणार आहे.
- आतापर्यंत प्रशिक्षित केलेल्या महिला या अकुशल होत्या. प्रशिक्षणानंतर त्यांच्या मिळकतीमध्ये प्रति दिन ३५० रुपयांपर्यंत वाढ झाली, असे कंपनीचे सह कार्यकारी अध्यक्ष अनुराग अंग्रेश यांनी सांगितले.

‘टिष्ट्वटर’चाही पुढाकार
सोशल मीडियासुद्धा महिला दिनासाठी सज्ज झाले आहे. ‘टिष्ट्वटर’ने ८ मार्चला काही
‘महिला दिवस’, ‘हमसे है हिंमत’, ‘नारीशक्ती’ यासारखे देवनागरीतील हॅशटॅग तयार
केले आहेत.


Web Title: Women's Day 2018: 41% of the women in the country are not led by women
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.