lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटीच्या ई-वे बीलमध्ये चूक झाल्यास काय करावे ?

जीएसटीच्या ई-वे बीलमध्ये चूक झाल्यास काय करावे ?

१ फेबु्रवारी पासून आंतरराज्यीय वाहतुकीसाठी सर्वांना ई-वे बील निर्मित करणे अनिवार्य आहे तर त्याच्या अटी कोणत्या ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 01:15 AM2018-01-29T01:15:55+5:302018-01-29T01:16:06+5:30

१ फेबु्रवारी पासून आंतरराज्यीय वाहतुकीसाठी सर्वांना ई-वे बील निर्मित करणे अनिवार्य आहे तर त्याच्या अटी कोणत्या ?

 What to do if GST gets wrong in e-way Bill? | जीएसटीच्या ई-वे बीलमध्ये चूक झाल्यास काय करावे ?

जीएसटीच्या ई-वे बीलमध्ये चूक झाल्यास काय करावे ?

- सी. ए. उमेश शर्मा

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, १ फेबु्रवारी पासून आंतरराज्यीय वाहतुकीसाठी सर्वांना ई-वे बील निर्मित करणे अनिवार्य आहे तर त्याच्या अटी कोणत्या ?
कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, वाहतुकीतील वस्तूंचे मूल्य हे ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर पुरवठादाराला ई-वे बील निर्मित करणे अनिवार्य आहे. जर पुरवठादार आणि प्राप्तकर्ता या दोघांनीही ई-वे बील निर्मित नाही केले तर ई-वे बील निर्मित करण्याची जबाबदारी ही वाहतूकदारावर येते. ई-वे बील हे हाताने (म्यॅन्युअली) तयार करता येत नाही. ते फक्त संगणकीकृत (कॉम्प्युटराईज) तयार करता येईल.
अर्जुन : कृष्णा, ई-वे बिलामध्ये काय काय माहिती द्यावी लागेल ?
कृष्ण : अर्जुना, ई-वे बिलामध्ये दोन भाग असतात भाग ‘अ’ मध्ये प्राप्तकर्त्याचा जीएसटीआयएन, पिनकोड, पावती क्रमांक, दिनांक, वस्तूचे मूल्य, एचएसएन कोड, वाहतूक दस्तऐवज क्रमांक, वाहतुकीचे कारण, इत्यादी तपशील द्यावा लागेल. तसेच भाग ‘ब’मध्ये वाहतूकदाराचा तपशील द्यावा लागेल.
अर्जुन : कृष्णा, जर करपावती किंवा डिलिव्हरी चलनावरील माहिती आणि ई-वे बिलावरील माहिती यात विसंगती आढळली तर, ई-वे बिलामध्ये बदल किंवा सुधारणा केली जाऊ शकते का?
कृष्ण : अर्जुना, एकदा निर्मित केलेले ई-वे बील हे बदली किंवा सुधारीत करता येत नाही. अशा प्रकरणामध्ये चुकीच्या माहितीसह निर्मित केलेले ई-वे बील रद्द केले जाऊ शकते आणि सदर वाहतुकीसाठी नवीन बील निर्मित केले जाऊ शकते. ई-वे बिलाचे रद्दीकरण हे निर्मितीपासून २४ तासांच्या आत करणे आवश्यक आहे.
अर्जुन : कृष्णा, ई-वे बिलाच्या भाग ‘ब’मधील तपशिलामध्ये बदल केला जाऊ शकतो का?
कृष्ण : अर्जुना, भाग ‘ब’मध्ये वाहतूकदाराचा तपशिल देणे आवश्यक आहे. वाहतुकीमध्ये जर काही बदल झाले तर त्याची माहिती भाग ‘ब’मध्ये देणे अनिवार्य आहे. म्हणजेच भाग ‘ब’ हा अद्ययावत केला जाऊ शकतो. उदा- वस्तूंची वाहतूक एका गाडीतून होत असेल परंतु ती गाडी मध्येच खराब झाली आणि वाहतूक दुसठया गाडीने चालू ठेवली तर याची माहिती भाग ‘ब’ मध्ये अद्ययावत करावी लागेल.
अर्जुन : कृष्णा, ई-वे बील हे कोणाद्वारे रद्द केले जाऊ शकते ?
कृष्ण : अर्जुना, एकदा तयार केलेले ई-वे बील हे डिलीट करता येत नाही. परंतु ते ज्याने निर्मित केले त्याद्वारे २४ तासांच्या आत रद्द केले जाऊ शकते. जर ई-वे बील हे सुयोग्य अधिकाºयाद्वारे सत्यापित झालेले असेल तर ते रद्द करता येत नाही. त्याचप्रमाणे जर वस्तूंंची वाहतूक झाली नाही किंवा ई-वे बिलामध्ये दाखल केलेल्या तपशीलानुसार वस्तूंची वाहतूक झाली नाही तरीही ई-वे बील रद्द केले जाऊ शकते.
अर्जुन : कृष्णा, प्राप्तकर्ता ई-वे बील रद्द करू शकतो का ?
कृष्ण : अजुर्ना, होय. ई-वे बील हे निर्मितीपासून ७२ तासांच्या आत रद्द करण्याचा प्राप्तकर्त्याला अधिकार आहे.

अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा ?

च्कृष्ण : अजुर्ना, जूने दिवस आता गेलेले आहेत. हे जीएसटीचे युग आहे. यात आता इन्व्हाईस मध्ये काही बदल करता येणार नाही.
च्त्यामूळे अगोदर संपूर्ण सुयोग्य माहितीच्या आधारे इन्व्हाईस बनवावे आणि त्यानुसार ई-वे बील निर्मीत करावे.

Web Title:  What to do if GST gets wrong in e-way Bill?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.