lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोबाइल इंटरनेटचा वापर सुसाट

मोबाइल इंटरनेटचा वापर सुसाट

मोबाइलवरून वेगवान इंटरनेट सेवा मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर सरत्या तीन वर्षांत इंटरनेटच्या वापरासाठी मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचे दिसून आले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2016 02:48 AM2016-06-02T02:48:48+5:302016-06-02T02:48:48+5:30

मोबाइलवरून वेगवान इंटरनेट सेवा मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर सरत्या तीन वर्षांत इंटरनेटच्या वापरासाठी मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचे दिसून आले आहे.

Use the mobile internet comfortably | मोबाइल इंटरनेटचा वापर सुसाट

मोबाइल इंटरनेटचा वापर सुसाट

मुंबई : मोबाइलवरून वेगवान इंटरनेट सेवा मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर सरत्या तीन वर्षांत इंटरनेटच्या वापरासाठी मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचे दिसून आले आहे.
कॉम्प्युटर आणि लॅपटॉपच्या तुलनेत मोबाइल इंटरनेटच्या वापराचा वेग वर्षाकाठी १५ टक्क्यांनी वाढला असल्याची माहिती मोबाइल उद्योगाशी संबंधित एका अहवालात प्रसिद्ध झाली आहे.
गेल्या पाच वर्षात देशात इंटरनेट झपाट्याने वाढले आहे. मोबाइलच्या माध्यमातून इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांना वापर करणे अधिक सुलभ झाले आहे. मोबाइल इंटरनेटच्या वापरात वाढ होण्यामागचे दुसरे कारण म्हणजे, हा वाढता वापर लक्षात घेऊन आॅनलाइन क्षेत्रात असलेल्या अनेक कंपन्यांनी आपल्या वेबसाइट आणि अ‍ॅप्स ही मोबाइलच्या माध्यमातून ग्राहकांना सुलभतेने वापरता येतील, अशा पद्धतीने विकसित केली आहेत.

Web Title: Use the mobile internet comfortably

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.