Lokmat Money > बिझनेस न्यूज > वित्तीय तुटीचे उद्दिष्ट ३.४ टक्क्यांपर्यंत

वित्तीय तुटीचे उद्दिष्ट ३.४ टक्क्यांपर्यंत

२0१७-१८ या वर्षाच्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) ३.३ टक्के ३.४ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे

By admin | Published: January 24, 2017 12:47 AM2017-01-24T00:47:16+5:302017-01-24T00:47:16+5:30

२0१७-१८ या वर्षाच्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) ३.३ टक्के ३.४ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे

The target of fiscal deficit is 3.4% | वित्तीय तुटीचे उद्दिष्ट ३.४ टक्क्यांपर्यंत

वित्तीय तुटीचे उद्दिष्ट ३.४ टक्क्यांपर्यंत

नवी दिल्ली : २0१७-१८ या वर्षाच्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) ३.३ टक्के ३.४ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले जाण्याची शक्यता आहे.
गोल्डमॅन सॅशने आपल्या अहवालात ही माहिती दिली. अहवालात म्हटले आहे की, नोटाबंदीनंतरच्या काळात निर्माण झालेले कमजोर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर प्रोत्साहन पॅकेजची मागणी होत आहे. त्याचवेळी वित्तीय मजबुतीच्या दिशेने मार्गक्रमण सुरू ठेवावे लागणार आहे. अशा परिस्थितीत सरकार प्रत्येक पाऊल फार काळजीपूर्वक उचलेल. आम्हाला असे वाटते की, सरकार अर्थसंकल्पात वित्तीय तुटीचे उद्दिष्ट जीडीपीच्या ३.३ टक्के ठेवील. हे उद्दिष्ट सरकारने मध्यम कालावधीसाठी ठरविलेल्या वित्तीय मजबुतीकरण कार्यक्रमात निर्धारित केलेल्या तुट उद्दिष्टापेक्षा ३0 आधार अंकांनी जास्त आहे. वित्तीय तूटीतील अल्पशी कपातही नोटाबंदीनंतर कमजोर झालेल्या मागणीला उभारी देणारी ठरू शकेल. गोल्डमॅन सॅशने म्हटले की, २0१६-१७ या वर्षासाठी ठरविण्यात आलेले ३.५ टक्के वित्तीय तुटीचे उद्दिष्ट सरकार गाठू शकते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The target of fiscal deficit is 3.4%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.