lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गृहकर्जासाठी स्टेट बँकेचे आता समान व्याजदर लागू

गृहकर्जासाठी स्टेट बँकेचे आता समान व्याजदर लागू

सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाने आपल्या विविध गृहकर्ज योजनांसाठी समान दर आकारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे

By admin | Published: August 27, 2014 01:42 AM2014-08-27T01:42:28+5:302014-08-27T01:42:28+5:30

सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाने आपल्या विविध गृहकर्ज योजनांसाठी समान दर आकारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे

State Bank of India has applied the same interest rate for home loan | गृहकर्जासाठी स्टेट बँकेचे आता समान व्याजदर लागू

गृहकर्जासाठी स्टेट बँकेचे आता समान व्याजदर लागू

मुंबई - सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाने आपल्या विविध गृहकर्ज योजनांसाठी समान दर आकारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. याची अंमलबजावणी २६ आॅगस्ट २०१४ पासून लागू झाली आहे.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ७५ लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जासाठी बेस दराच्या १० अंश जास्तीने व्याजदर असेल तर ७५ लाखांवरील गृहकर्जासाठी बेसदराच्या १५ अंश जास्तीने व्याजदर असेल. यामुळे फ्लोटिंग अथवा फिक्स्ड व्याजदरातील दरी संपुष्टात येणार आहे. फिक्स्ड आणि फ्लोटिंग यांच्यामधील एकूण तफावतीचा विचार करता सध्या ७५ लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जात ०.१५ टक्के इतकी कपात झाल आहे. परिणामी, ७५ लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाचा व्याजदर १०.१० टक्के तर ७६ लाख रुपयांवरील गृहकर्जाचा व्याजदर १०.१५ टक्के इतका झाला आहे.
परवडणाऱ्या दरातील घरांच्या निर्मितीला बँकांचे पाठबळ मिळावे, यासाठी हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने असा निर्णय घेतल्याने आता अन्य बँकांही अशाच पद्धतीने दर आकारणी करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: State Bank of India has applied the same interest rate for home loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.