lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘रिलायन्स डिजिटल’चा ११ ते १५ आॅगस्टदरम्यान विशेष सेल

‘रिलायन्स डिजिटल’चा ११ ते १५ आॅगस्टदरम्यान विशेष सेल

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील देशातील अव्वल किरकोळ विक्रेते असलेल्या रिलायन्स डिजिटलने स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष सेल जाहीर केला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 02:52 AM2018-08-11T02:52:06+5:302018-08-11T02:52:09+5:30

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील देशातील अव्वल किरकोळ विक्रेते असलेल्या रिलायन्स डिजिटलने स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष सेल जाहीर केला आहे.

Special cell for Reliance Digital in August 11-15 | ‘रिलायन्स डिजिटल’चा ११ ते १५ आॅगस्टदरम्यान विशेष सेल

‘रिलायन्स डिजिटल’चा ११ ते १५ आॅगस्टदरम्यान विशेष सेल

मुंबई : इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील देशातील अव्वल किरकोळ विक्रेते असलेल्या रिलायन्स डिजिटलने स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष सेल जाहीर केला आहे. ११ ते १५ आॅगस्टदरम्यान देशभरात हा सेल सुरू होत आहे.
या सेलअंतर्गत ग्राहकांना १० टक्के ‘कॅशबॅक’ मिळणार आहे. अमेरिकन एक्स्प्रेस, सिटी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय व कोटक महिंद्रा बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास या आॅफरचा लाभ घेता येणार आहे.
>रिलायन्स डिजिटल व माय जिओच्या सर्व शो-रूम्स ही आॅफर उपलब्ध असेल. लॅपटॉप खरेदी केल्यासही या आॅफरचा लाभ घेता येईल. आॅफरखेरीज शून्य रुपये डाऊन पेमेंट करून सर्वोत्तम तंत्रज्ञानावर आधारित वस्तूंची खरेदी ग्राहकांना या सेलअंतर्गत करता येणार आहे.रिलायन्स डिजिटलचे शो-रूम्स देशभरात ८०० ठिकाणी आहे. त्यापैकी ३०० शो-रूम्स भव्य स्वरूपात आहेत. देशभरात १८०० माय जिओ शो-रूम्स आहेत. जगभरातील २०० ब्रॅण्ड्सची ४ हजार उत्पादने या शो-रूम्समध्ये सादर करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी मोबाइल हॅण्डसेट्स, लॅपटॉप्स, एलईडी, एलसीडी टीव्ही, होम थिएटर, डिजिटल कॅमेरा आदी तंत्रज्ञानाशी संबंधित उत्पादनांच्या खरेदीसाठी हा सेल असेल.

Web Title: Special cell for Reliance Digital in August 11-15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.