lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शिखा शर्मा पुन्हा अ‍ॅक्सिसच्या सीईओ

शिखा शर्मा पुन्हा अ‍ॅक्सिसच्या सीईओ

अ‍ॅक्सिस बँकेने सध्याच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा यांचीच त्या पदावर आणखी तीन वर्षांसाठी नेमणूक केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 03:30 AM2017-07-28T03:30:01+5:302017-07-28T03:30:04+5:30

अ‍ॅक्सिस बँकेने सध्याच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा यांचीच त्या पदावर आणखी तीन वर्षांसाठी नेमणूक केली.

shikha sharma ceo of Axis Bank | शिखा शर्मा पुन्हा अ‍ॅक्सिसच्या सीईओ

शिखा शर्मा पुन्हा अ‍ॅक्सिसच्या सीईओ

मुंबई : अ‍ॅक्सिस बँकेने सध्याच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा यांचीच त्या पदावर आणखी तीन वर्षांसाठी नेमणूक केली. त्यामुळे बँकेला नवा सीईओ मिळेल व शर्मा कदाचित टाटा समूहाकडे जातील या अटकळींना पूर्णविराम मिळाला.
शर्मा यांची या पदावरील सध्याची मुदत जून २०१८मध्ये संपत आहे. त्यानंतर आणखी तीन वर्षांसाठी त्यांची फेरनियुक्ती करण्याचा निर्णय बँकेच्या
संचालक मंडळाने बुधवारी घेतला. तसे शेअर बाजारास कळविले. नियामक संस्थांच्या संमतीचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर ही फेरनियुक्ती लागू होईल.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल विमा कंपनीतून आठ वर्षांपूर्वी अ‍ॅक्सिस बँकेत आल्यापासून शर्मा तेथे या पदावर आहेत.

Web Title: shikha sharma ceo of Axis Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.