lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > १५ वर्षांत १०० नवे विमानतळ उभारणार, ४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित

१५ वर्षांत १०० नवे विमानतळ उभारणार, ४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित

आगामी १५ वर्षांत १०० नवे विमानतळ उभारण्याची योजना सरकारने आखली आहे. संपर्क सेवेचा विस्तार करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पावर ४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 04:30 AM2017-11-07T04:30:44+5:302017-11-07T04:30:50+5:30

आगामी १५ वर्षांत १०० नवे विमानतळ उभारण्याची योजना सरकारने आखली आहे. संपर्क सेवेचा विस्तार करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पावर ४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे

To set up 100 new airports in 15 years, investment worth 4 lakh crores is expected | १५ वर्षांत १०० नवे विमानतळ उभारणार, ४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित

१५ वर्षांत १०० नवे विमानतळ उभारणार, ४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित

नवी दिल्ली : आगामी १५ वर्षांत १०० नवे विमानतळ उभारण्याची योजना सरकारने आखली आहे. संपर्क सेवेचा विस्तार करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पावर ४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे, असे उड्डयन राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेथे विमानतळांची सोय नाही, अशा शहरांत ७० विमानतळ उभारण्यात येतील. उरलेले ३० विमानतळ हे आधीच विमानतळ असलेल्या ठिकाणी विस्तार कार्याच्या स्वरूपात अथवा दुसरे विमानतळ म्हणून विकसित करण्यात येईल.
सिन्हा यांनी एका मुलाखतीत म्हटले की, भारतात सध्या १०० विमानतळ आहेत. तथापि, आता विमानतळांची गरज वाढत चालली आहे. भारतातील देशांतर्गत विमान प्रवासाची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. याचा लाभ उठविण्यासाठी इंडिगो आणि स्पाईस जेट यांसारख्या खाजगी विमान कंपन्यांनी आपल्या ताफ्यात १०० छोटी विमाने नव्याने समाविष्ट करण्याची योजना आखली आहे.

Web Title: To set up 100 new airports in 15 years, investment worth 4 lakh crores is expected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.