Lokmat Money > बिझनेस न्यूज > ईपीएफओ घेणार एजंटांची सेवा

ईपीएफओ घेणार एजंटांची सेवा

कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या योजनांच्या सेवेत सुधारणा करण्यासाठी एजंटांची सेवा घेण्याची योजना तयार करीत आहे.

By admin | Published: December 26, 2014 01:18 AM2014-12-26T01:18:33+5:302014-12-26T01:18:33+5:30

कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या योजनांच्या सेवेत सुधारणा करण्यासाठी एजंटांची सेवा घेण्याची योजना तयार करीत आहे.

Service of agents taking EPFO | ईपीएफओ घेणार एजंटांची सेवा

ईपीएफओ घेणार एजंटांची सेवा

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या योजनांच्या सेवेत सुधारणा करण्यासाठी एजंटांची सेवा घेण्याची योजना तयार करीत आहे. आयकर विभाग करदात्यांची सोय आणि अनुपालनात सुधारणा करण्यासाठी एजंटांची सेवा सध्या घेत आहेच.
ईपीएफओचे केंद्रीय भविष्य निधी आयुक्त के.के. जालान गुरुवारी ‘श्रम मंत्रालयात सुशासन’ विषयावरील परिसंवादात बोलत होते.
जालान म्हणाले, ‘आयकर विभागासारखी आमच्या अंंशधारकांच्या सोयीसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या आम्हाला एजंटांची सेवा घ्यावी लागेल.’ भविष्य निधीचा दावा, अनुपालनाचे मुद्दे व ईपीएफचे रिटर्नस् भरणे इत्यादी सेवांसाठी एजंटांची सेवा घेण्याच्या प्रस्तावावर आम्ही काम करीत आहोत. ईपीएफओचे पाच कोटी सदस्य असून त्यातील बहुतांश सदस्य संघटित क्षेत्रातील आहेत, असे जालान म्हणाले.

Web Title: Service of agents taking EPFO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.