lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स १९५ अंकांनी कोसळला

सेन्सेक्स १९५ अंकांनी कोसळला

झारखंड आणि जम्मू-काश्मिरातील विधानसभा निवडणुकांच्या परिणामांवर संमिश्र प्रतिसाद देताना भारतीय शेअर बाजार मंगळवारी कोसळले

By admin | Published: December 24, 2014 12:10 AM2014-12-24T00:10:31+5:302014-12-24T00:10:31+5:30

झारखंड आणि जम्मू-काश्मिरातील विधानसभा निवडणुकांच्या परिणामांवर संमिश्र प्रतिसाद देताना भारतीय शेअर बाजार मंगळवारी कोसळले

The Sensex fell by 195 points | सेन्सेक्स १९५ अंकांनी कोसळला

सेन्सेक्स १९५ अंकांनी कोसळला

मुंबई : झारखंड आणि जम्मू-काश्मिरातील विधानसभा निवडणुकांच्या परिणामांवर संमिश्र प्रतिसाद देताना भारतीय शेअर बाजार मंगळवारी कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १९५.३३ अंकांनी कोसळून २७,५0६.४६ अंकांवर बंद झाला. बाजाराला नफा वसुलीचा फटका बसला असल्याचे ब्रोकरांनी सांगितले.
३0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीत होता. जागतिक बाजारातील तेजीचा लाभ सकाळी दिसून आला. नंतर मात्र नफा वसुलीचे सत्र सुरू झाले. सत्राअखेरीस 0.७१ टक्क्यांची म्हणजेच १९५.३३ अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २७,५0६.४६ अंकांवर बंद झाला. मागील तीन सत्रांत सेन्सेक्सने सलग तेजी नोंदविली आहे. या तीन सत्रांत सेन्सेक्स १ हजार अंकांनी अथवा ३.७१ टक्क्यांनी वाढला आहे. मंगळवारी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही ५७ अंकांनी अथवा 0.६८ अंकांनी घसरून ८,२६७ अंकांवर बंद झाला. सेसा स्टरलाईटला घसरणीचा सर्वाधिक ३.१५ टक्के फटका बसला. (वृत्तसंस्था)
 

 

Web Title: The Sensex fell by 195 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.