lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिटेल स्टोअर्स गजबजू लागली, दिवाळी खरेदी : विक्रीमध्ये २0 टक्क्यांची वाढ

रिटेल स्टोअर्स गजबजू लागली, दिवाळी खरेदी : विक्रीमध्ये २0 टक्क्यांची वाढ

सणासुदीच्या काळातही मालाला उठाव नसल्यामुळे हैराण असलेल्या रिटेल क्षेत्राला अखेर दिवाळी पावली आहे. दिवाळीच्या आधीच्या आठवड्याच्या अखेरीस मॉल मालक आणि वस्त्र उत्पादकांच्या विक्रीत १५ ते २0 टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:58 AM2017-10-17T00:58:47+5:302017-10-17T00:59:03+5:30

सणासुदीच्या काळातही मालाला उठाव नसल्यामुळे हैराण असलेल्या रिटेल क्षेत्राला अखेर दिवाळी पावली आहे. दिवाळीच्या आधीच्या आठवड्याच्या अखेरीस मॉल मालक आणि वस्त्र उत्पादकांच्या विक्रीत १५ ते २0 टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे.

Retail stores worn out, buying Diwali: 20 percent increase in sales | रिटेल स्टोअर्स गजबजू लागली, दिवाळी खरेदी : विक्रीमध्ये २0 टक्क्यांची वाढ

रिटेल स्टोअर्स गजबजू लागली, दिवाळी खरेदी : विक्रीमध्ये २0 टक्क्यांची वाढ

 मुंबई / नवी दिल्ली : सणासुदीच्या काळातही मालाला उठाव नसल्यामुळे हैराण असलेल्या रिटेल क्षेत्राला अखेर दिवाळी पावली आहे. दिवाळीच्या आधीच्या आठवड्याच्या अखेरीस मॉल मालक आणि वस्त्र उत्पादकांच्या विक्रीत १५ ते २0 टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे. रिटेल क्षेत्रातील एकूण वार्षिक विक्रीपैकी तब्बल ४0 टक्के विक्री सणासुदीच्या हंगामात होते.
मुंबईतही खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. फिनिक्स मिल्स येथील राजेंद्र कालकर यांनी सांगितले की, मुंबईतील मॉलला भेट देणाºयांची संख्या आता १0 ते १५ टक्क्यांनी वाढली आहे. या सप्ताहाच्या अखेरीस ७0 ते ८0 हजार लोकांनी मॉलला भेट दिली. आता दिवाळी आल्यासारखे वाटत आहे. दिल्लीतील एका मॉलचे कार्यकारी संचालक योगेश्वर शर्मा यांनी सांगितले की, यंदाच्या दिवाळीच्या खरेदीची सुरुवात फारच संथ राहिली.
तथापि, गेल्या आठवड्याच्या अखेरीस बाजारातील खरेदी व गजबज वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आम्ही चांगला व्यवसाय केला आहे. हा उत्साह ख्रिसमस, नवीन वर्ष आणि व्हॅलेंटाइन डेपर्यंत कायम राहील, अशी आम्हाला आशा आहे. डीएलएफ शॉपिंग मॉल्सच्या प्रमुख पुष्पा बेक्टर यांनी सांगितले की, या सप्ताहात व्यवसाय प्रचंड प्रमाणात वाढला आहे. काही ठिकाणी तर २0 ते २५ टक्के व्यवसायवाढ झाली आहे.
एथनिक वेअर ब्रँड बिबाचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ बिंद्रा म्हणाले की, सप्ताहअखेरीस कंपनीच्या विक्रीत तब्बल ४५ टक्क्यांची वाढ झाली आहे. प्युमा इंडियाचे एमडी अभिषेक गांगुली यांनी सांगितले की, जीएसटीनंतर पहिल्यांदाच विक्री वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ २९ टक्के आहे.

आॅनलाइन शॉपिंगचा परिणाम

यंदा अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएम या आॅनलाइन कंपन्यांनी शॉपिंगवर भरमसाट डिस्काउंट जाहीर केल्यामुळे बाजारात ग्राहक कमी होते. याशिवाय जीएसटी लागू होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात खरेदी होऊन गेल्यामुळेही बाजारात ग्राहकवर्ग कमी होता.

Web Title: Retail stores worn out, buying Diwali: 20 percent increase in sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.