lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > करनीती - विघ्नहर्ता, जीएसटीच्या रिटर्नची विघ्ने दूर करा

करनीती - विघ्नहर्ता, जीएसटीच्या रिटर्नची विघ्ने दूर करा

करदात्यावर जीएसटी कायद्याअंतर्गत येणाऱ्या  विघ्नांना विघ्नहर्ता दूर करेल परंतु यासाठी करदात्याला जीएसटीची विद्या ग्रहण करावी लागेल. तसेच कर अधिकाऱ्यानीसुद्धा वेळेवर विघ्ने जे की, जीएसटीएनवर येत आहेत ती दूर करावी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 01:11 AM2017-08-21T01:11:05+5:302017-08-21T01:11:19+5:30

करदात्यावर जीएसटी कायद्याअंतर्गत येणाऱ्या  विघ्नांना विघ्नहर्ता दूर करेल परंतु यासाठी करदात्याला जीएसटीची विद्या ग्रहण करावी लागेल. तसेच कर अधिकाऱ्यानीसुद्धा वेळेवर विघ्ने जे की, जीएसटीएनवर येत आहेत ती दूर करावी.

Karaniti - Fixer, remove GST's return woes | करनीती - विघ्नहर्ता, जीएसटीच्या रिटर्नची विघ्ने दूर करा

करनीती - विघ्नहर्ता, जीएसटीच्या रिटर्नची विघ्ने दूर करा

- सी. ए. उमेश शर्मा

करदात्यावर जीएसटी कायद्याअंतर्गत येणाऱ्या  विघ्नांना विघ्नहर्ता दूर करेल परंतु यासाठी करदात्याला जीएसटीची विद्या ग्रहण करावी लागेल. तसेच कर अधिकाऱ्यानीसुद्धा वेळेवर विघ्ने जे की, जीएसटीएनवर येत आहेत ती दूर करावी.

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा या आठवड्यात गणपती बाप्पाचे आगमन होत आहे, परंतु सध्या जीएसटीमुळे सर्वत्र धावपळ चालू आहे तर गणपती बाप्पा काय करतील?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, गणपती बाप्पाचे एक नाव ‘विघ्नहर्ता’ पण आहे. तो सर्वांचे विघ्न, अडचणी दूर करतो. त्याचप्रमाणे तो आपलेही जीएसटीचे प्रश्न सोडवायला आपल्याला मदत करू शकतो.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीचे प्रथम रिटर्न भरताना करदात्याने काय काळजी घ्यावी ?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीमध्ये मासिक रिटर्न भरावे लागणार आहे. मागील महिन्यात जीएसटी लागू झाला त्यामुळे त्याचे प्रथम रिटर्न आॅगस्ट महिन्यात भरावे लागेल. सरकारने समरी रिटर्नची संकल्पना आणल्यामुळे या महिन्यात सर्वांना फॉर्म जीएसटीआर-३बी भरावा लागेल. त्यासाठी २० आॅगस्ट ही शेवटची तारीख होती, पण आता ती वाढवून २५ आॅगस्ट करण्यात आली आहे. ट्रान्झिशनचा फॉर्म जीएसटी टीआरएएन-०१ हा २८ तारखेपर्यंत भरावा लागेल. पुढील महिन्यापासून करदात्याने फॉर्म जीएसटीआर-०१ मध्ये रिटर्न भरावे लागेल. करदात्याने ह्या सर्वांमध्ये अचूक आणि सुयोग्य माहिती देणे आवश्यक आहे.
अर्जुन : रिटर्न भरताना कोणकोणती विघ्ने येणार आहेत ?
कृष्ण : अर्जुना, हा कायदा नवीन असल्यामुळे रिटर्न भरताना विघ्न तर येणारच आहे. जसे की,
१) सर्वात मोठे विघ्न म्हणजे जीएसटीच्या साइटचे आहे. पेमेंटची विन्डो प्रतिेसाद देत नाही आणि खूप वेळा हँग होत आहे. म्हणूनच रिटर्नची आणि पैसे भरण्याची तारीख वाढवण्यात आली आहे.
२) फॉर्म जीएसटी टीआरएएन-१ दाखल करण्याची तारीख २८ आहे, तर हा फॉर्म भरण्यासाठी फक्त आठ दिवसच मिळतात.
३) तसेच आरसीएमच्या संकल्पनेशी निगडित खूप तरतुदी आहेत. अनोंदणीकृत व्यापाºयाकडून खरेदी करण्यावर आलेली बंधने पाळावी लागतील. खरेदीवरचा कर आरसीएमद्वारे भरायचा असेल तर तो आधी भरावा लागेल आणि नंतरच त्याचा आयटीसी मिळेल.
४) प्रत्येक महिन्यात दाखल केलेले रिटर्न रिव्हाईज नाही केले जाऊ शकत. त्यासाठी पुढील महिन्यापर्यंत वाट पाहावी लागेल.
५) करदात्याने केलेले पेमेंट हे इलेक्ट्रॉनिक लेजरमध्ये प्रतिबिंबित होण्यासाठी १ किंवा २ दिवससुद्धा वेळ लागू शकतो.
६) प्रत्येक महिन्याला लेखापुस्तके अद्ययावत करावे लागतील आणि प्रॉफिट अ‍ॅण्ड लॉस अकाउंट आणि बॅलन्सशिट बनवावी लागेल.
अर्जुन : कृष्णा, हे सर्व विघ्न दूर करण्यासाठी काय करावे लागेल ?
कृष्ण : अर्जुना, कोणत्याही गोष्टीची सवय असणे हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक व्यापाºयाने आता सुयोग्य मासिक नोंदी ठेवणे आवश्यक आहे. त्यांनी याची
सवय लावून घ्यावी. प्रथमच मासिक रिटर्न जाणार आहेत. त्यासाठी व्यापाºयाला प्रत्येक महिन्याचे योग्य रेकॉर्ड ठेवावे लागतील. प्रत्येक महिन्याला खरेदीची बरोबर माहिती द्यावी लागेल.

Web Title: Karaniti - Fixer, remove GST's return woes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.