lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गृहप्रदर्शन मुख्य बातमी जोड

गृहप्रदर्शन मुख्य बातमी जोड

या प्रदर्शनाचे व्हेन्यू पार्टनर म्हणून प्रोझोन मॉल तसेच आऊटडोअर पब्लिसिटीसाठी अभिषेक ॲडव्हर्टायजर्स हे आहेत.

By admin | Published: February 14, 2015 11:50 PM2015-02-14T23:50:32+5:302015-02-14T23:50:32+5:30

या प्रदर्शनाचे व्हेन्यू पार्टनर म्हणून प्रोझोन मॉल तसेच आऊटडोअर पब्लिसिटीसाठी अभिषेक ॲडव्हर्टायजर्स हे आहेत.

Home News Pair | गृहप्रदर्शन मुख्य बातमी जोड

गृहप्रदर्शन मुख्य बातमी जोड

प्रदर्शनाचे व्हेन्यू पार्टनर म्हणून प्रोझोन मॉल तसेच आऊटडोअर पब्लिसिटीसाठी अभिषेक ॲडव्हर्टायजर्स हे आहेत.
--------------
चौकट
ग्राहकांचे बोल...
संदीप कुलकर्णी या ग्राहकाने सांगितले की, संपूर्ण प्रदर्शन पाहण्यास अडीच ते तीन तास लागले. विविध गृहप्रकल्पांची माहिती व किमतीतील तफावत, बांधकामाचा दर्जा याची संपूर्ण माहिती मिळाली. माझ्या बजेटमधील घर मिळाले, असा आनंद त्यांनी व्यक्त केला. विश्वास सहस्त्रबुद्धे म्हणाले की, माझा मुलगा आयटी कंपनीत आहे. त्यास पुण्याल स्थायिक व्हायचे आहे. तिथेच आम्ही काही फ्लॅट पाहिले, पण येथे लोकमतने आयोजित प्रदर्शनात आम्हाला पुण्यातील मनपसंत परिसरातील फ्लॅटची माहिती मिळाली व आमच्या बजेटमध्येही असल्याने लवकरच आम्ही पुण्यातील त्या गृहप्रकल्पाला भेट देणार आहोत. मोहन भावसार या सरकारी नोकरदाराने सांगितले की, औरंगाबादच्या आसपासच्या परिसरात मागील २ वर्षांपासून घर पाहत आहे; पण आज गृहप्रदर्शनात मला शेंद्र परिसरातील बजेटमधील घर मिळाले व माझी शोधमोहीम येथे पूर्ण झाली, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया ग्राहकांनी व्यक्त केल्या.
--------------------
चौकट
------- भाग्यवान विजेत्यांना चांदीचे नाणे
गृहप्रदर्शनास भेट देणार्‍या ग्राहकांकडून एक फॉर्म भरून घेतला जात आहे. दर तासाला जमा होणारे फॉर्म एकत्र करून त्यातून सोडत काढली जात आहे. भाग्यवान विजेत्याला चांदीचे नाणे दिले जात आहे. शनिवारी पहिल्या दिवशी------ भाग्यवान ग्राहकांना चांदीचे नाणे मिळाले. रविवारी १५ रोजीही दर तासाला भाग्यवान विजेत्यांना चांदीचे नाणे देण्यात येणार आहे.
---------------
चौकट
प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस
लोकमतच्या वतीने आयोजित पुणे-औरंगाबाद प्रॉपर्टी शोचा उद्या रविवारी १५ फेब्रुवारी रोजी शेवटचा दिवस आहे. प्रोझोन मॉल येथे सकाळी १० ते रात्री ८ वाजेदरम्यान गृहप्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे, याचा लाभ गृहइच्छुकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: Home News Pair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.