lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनुत्पादक भांडवलावरील उपाय उद्योगांच्या मदतीसाठी, सीआयआयची शिखर परिषद

अनुत्पादक भांडवलावरील उपाय उद्योगांच्या मदतीसाठी, सीआयआयची शिखर परिषद

अनुत्पादक भांडवलावरील (एनपीए) उपाययोजनांचा हेतू अडचणीतील उद्योगांना अवसायनात काढणे हा नसून, त्यांना साह्य करणे हा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:19 AM2017-08-20T00:19:20+5:302017-08-20T00:19:36+5:30

अनुत्पादक भांडवलावरील (एनपीए) उपाययोजनांचा हेतू अडचणीतील उद्योगांना अवसायनात काढणे हा नसून, त्यांना साह्य करणे हा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.

For the help of unproductive capital solutions industries, CII's Summit Council | अनुत्पादक भांडवलावरील उपाय उद्योगांच्या मदतीसाठी, सीआयआयची शिखर परिषद

अनुत्पादक भांडवलावरील उपाय उद्योगांच्या मदतीसाठी, सीआयआयची शिखर परिषद

मुंबई : अनुत्पादक भांडवलावरील (एनपीए) उपाययोजनांचा हेतू अडचणीतील उद्योगांना अवसायनात काढणे हा नसून, त्यांना साह्य करणे हा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.
कॉन्फडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीजच्या (सीआयआय) वतीने आयोजित दिवाळखोरी शिखर परिषदेत ते म्हणाले, एनपीएची समस्या हाताळण्यासाठी ज्या उपाययोजना सरकार करीत आहे, त्यांचा उद्देश उद्योगांना अवसायनात काढणे हा अजिबात नाही. शक्य असल्यास सध्याच्या प्रवर्तकांच्या साह्याने अथवा नव्या भागीदारांच्या साह्याने कंपन्या आणि उद्योग वाचविणे हा त्यामागील उद्देश
आहे.
कर्जवसुली लवादांनी प्रभावी काम न केल्यामुळे एनपीएची समस्या गंभीर झाली आहे. कर्जदारांची सुरक्षा करणाºया व्यवस्थेत आम्ही अनेक वर्षे राहिलो आहोत. या व्यवस्थेने एनपीए वाढला. नव्या नादारी व दिवाळखोरी संहितेत कर्जदार आणि कर्जदाता यांच्यातील नातेसंबंधच पूर्ण बदलून टाकला आहे. कर्ज वसुलीला प्रधान्य दिले जाणार आहे.
जुन्या व्यवस्थेत कर्ज देणाºया संस्थांना वसुलीसाठी कर्जदारांचा पाठपुरावा करताना नाकीनऊ येत होते. नव्या व्यवस्थेने ती अडचण
दूर झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारी बँकांना भांडवल पुरविण्याची गरज-पटेल
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल म्हणाले की, एनपीएच्या समस्येवर मात करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना भांडवल पुरविण्याची गरज आहे. सध्या एनपीएचे प्रमाण ९.६ टक्के झाले आहे. ही बाब चिंताजनक आहे.

Web Title: For the help of unproductive capital solutions industries, CII's Summit Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.