lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याच्या भावाने गाठला तीन आठवड्यांचा नीचांक

सोन्याच्या भावाने गाठला तीन आठवड्यांचा नीचांक

कमजोर जागतिक स्थिती आणि स्थानिक आभूषण विक्रेत्यांची घटती मागणी या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या

By admin | Published: June 1, 2015 11:54 PM2015-06-01T23:54:29+5:302015-06-01T23:54:29+5:30

कमजोर जागतिक स्थिती आणि स्थानिक आभूषण विक्रेत्यांची घटती मागणी या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या

Gold prices eased to three-week low | सोन्याच्या भावाने गाठला तीन आठवड्यांचा नीचांक

सोन्याच्या भावाने गाठला तीन आठवड्यांचा नीचांक

नवी दिल्ली : कमजोर जागतिक स्थिती आणि स्थानिक आभूषण विक्रेत्यांची घटती मागणी या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या भावाने तीन आठवड्यांचा नीचांक गाठला. सोमवारी सोन्याचा भाव १०५ रुपयांच्या घसरणीसह २७,२२५ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. विक्रीच्या दबावाने चांदीचा भावही १७५ रुपयांनी घसरून ३८,४०० रुपये प्रतिकिलोवर आला.
बाजार सूत्रांनी सांगितले की, कमजोर जागतिक संकेत आणि आभूषण विक्रेत्यांची मागणी कमी झाल्याने स्थानिक सराफ्यात सोन्याच्या भावावर दबाव राहिला. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने मौल्यवान धातूंची आयात स्वस्त झाली. याचाही बाजार धारणेवर नकारात्मक परिणाम झाला.
परदेशी चलन विनिमय बाजारात दिवसभरात रुपया २२ पैशांच्या तेजीसह ६३.६० रुपये प्रति डॉलरवर पोहोचला. सोन्याप्रमाणेच तयार चांदीचा भाव १७५ रुपयांनी कमी होऊन ३८,४०० रुपये प्रतिकिलो आणि साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही १७० रुपयांनी घसरून ३८,१८० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५६,००० रुपये व विक्रीकरिता ५७,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold prices eased to three-week low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.