lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने तेजीत; चांदीत घट

सोने तेजीत; चांदीत घट

जागतिक बाजारात घसरण सुरू असतानाच राजधानी दिल्लीच्या सराफ्यात मंगळवारी सोन्याचा भाव ११० रुपयांनी वाढून २७,२१० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

By admin | Published: December 30, 2014 01:07 AM2014-12-30T01:07:43+5:302014-12-30T01:07:43+5:30

जागतिक बाजारात घसरण सुरू असतानाच राजधानी दिल्लीच्या सराफ्यात मंगळवारी सोन्याचा भाव ११० रुपयांनी वाढून २७,२१० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

Gold bullion; Silver decrease | सोने तेजीत; चांदीत घट

सोने तेजीत; चांदीत घट

नवी दिल्ली : जागतिक बाजारात घसरण सुरू असतानाच राजधानी दिल्लीच्या सराफ्यात मंगळवारी सोन्याचा भाव ११० रुपयांनी वाढून २७,२१० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तथापि, चांदीचा भाव औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांकडून मागणी घटल्याने ३७,२५० रुपये प्रतिकिलो राहिला.
बाजारातील जाणकारांनी सांगितले की, ग्राहकांची लग्नसराईच्या काळातली मागणी पूर्ण करण्यासाठी ज्वेलर्स व रिटेलर्स यांनी सोन्याची खरेदी केली; मात्र जागतिक बाजारात घसरणीचा कल राहिल्याने या मौल्यवान धातूचीही मागणी मर्यादित राहिली. सिंगापुरात सोन्याचा भाव ०.३ टक्क्यांनी घटून १,१९२ डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला.
राजधानी दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ११० रुपयांनी वधारून अनुक्रमे २७,२१० रुपये व २७,०१० रुपये प्रति १० ग्रॅमवर राहिला.

Web Title: Gold bullion; Silver decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.