lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने तेजीत; चांदी घसरली

सोने तेजीत; चांदी घसरली

जागतिक बाजारातील मजबूत कल आणि स्थानिक पातळीवर सणासुदीच्या मागणीमुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव

By admin | Published: November 19, 2014 01:17 AM2014-11-19T01:17:48+5:302014-11-19T01:17:48+5:30

जागतिक बाजारातील मजबूत कल आणि स्थानिक पातळीवर सणासुदीच्या मागणीमुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव

Gold bullion; Silver collapsed | सोने तेजीत; चांदी घसरली

सोने तेजीत; चांदी घसरली

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मजबूत कल आणि स्थानिक पातळीवर सणासुदीच्या मागणीमुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव ४० रुपयांच्या सुधारणेसह २६,८०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तथापि, चांदीवर विक्रीचा दबाव राहिला आणि ६८५ रुपयांच्या घसरणीसह ३५,८१५ रुपये प्रतिकिलोवर आला.
बाजार सूत्रांनी सांगितले की, लग्नसराईची मागणी आणि जागतिक बाजारातील मजबूत कल यामुळे सराफा व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांच्या खरेदीत काहीशी वाढ झाल्याने बाजारधारणेत सुधारणा नोंदली गेली आहे.
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने सुरक्षित गुंतवणुकीच्या रूपात सोन्याचे आकर्षण वाढले आणि यामुळे जागतिक बाजारात सोन्याबद्दलच्या धारणेत वाढ झाली.
देशी बाजाराचा कल निश्चित करणाऱ्या सिंगापुरात सोन्याचा भाव ०.६ टक्के तेजीसह १,१९३.४५ डॉलर प्रतिऔंस झाला.
दुसरीकडे तयार चांदीचा भाव ६८५ रुपयांनी घटून ३,८१५ रुपये प्रतिकिलो राहिला. चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ९५ रुपयांनी वाढून ३६,२५० रुपये प्रतिकिलो झाला. दरम्यान, चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ६०,००० रुपये व विक्रीकरिता ६१,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold bullion; Silver collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.