lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > इजिप्तमधून २,४०० टन कांदा आयात, आणखी आयात करण्याचे सरकारचे संकेत

इजिप्तमधून २,४०० टन कांदा आयात, आणखी आयात करण्याचे सरकारचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 01:29 AM2017-09-04T01:29:53+5:302017-09-04T01:30:02+5:30

 Egypt's 2,400 tons of onion import, government signs to import more | इजिप्तमधून २,४०० टन कांदा आयात, आणखी आयात करण्याचे सरकारचे संकेत

इजिप्तमधून २,४०० टन कांदा आयात, आणखी आयात करण्याचे सरकारचे संकेत

नवी दिल्ली : सरकारने देशांतर्गत कांदा पुरवठा सुरळीत राखत भाव नियंत्रित ठेवण्यासाठी इजिप्तमधून २,४०० टन कांदा आयात केला आहे, तसेच कांद्याचा भाव अवाजवी वाढल्यास आणखी आयात करण्याचे संकेतही सरकारने दिले आहेत.
ग्राहक कल्याण मंत्रालय कांद्याच्या भावावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. बव्हंशी किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार कांद्याचा भाव ४० ते ५० रुपयांदरम्यान आहे. इजिप्तमधून कांदा आयात करण्यात येणार असून, खासगी व्यापाºयांनी २,४०० टन कांद्याची मागणी नोंदणी केली आहे. मुंबई बंदरावर कंटेनर पोहोचत आहेत, असे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. ग्राहक कल्याण मंत्रालयाने व्यापाºयांशी चर्चा करून, काद्यांचा साठा, भाव आणि पुरवठा याबाबत आढावा घेतला.
आणखी ९ हजार टन कांद्याची खेप लवकर पोहोचण्याची शक्यता आहेत. कांद्याचे भाव अवाजवीपणे वाढल्यास, व्यापाºयांना आणखी आयात करण्यासाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. आयातीच्या मुद्द्यांवर ग्राहक कल्याण मंत्रालयाचे सचिव अविनाश के. श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आढावा घेण्यात आला. या बैठकीला वाणिज्य आणि कृषिमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच खासगी व्यापारी उपस्थित होते.
सध्या सरकार खासगी व्यापाºयांमार्फत कांदा आयात करीत आहे. सरकारी व्यापारी संस्थांचा यात समावेश करण्याचा अद्याप निर्णय झालेला नाही. सर्व राज्यांना व्यापाºयांवर साठवणुकीची मर्यादा घालण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title:  Egypt's 2,400 tons of onion import, government signs to import more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.