नवी दिल्ली : मुंबई आणि दिल्लीत आॅक्टोबरपासून सर्व बांधकाम परवाने आॅनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. कामात पारदर्शकता राहावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
शहर विकासमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले की, २ आॅक्टोबर २०१६ पासून मुंबई आणि दिल्लीत सर्व बांधकाम परवाने आॅनलाईन पद्धतीने करण्यात येतील. सरकार याबाबत रिअल इस्टेट विकास विधेयकाची अंमलबजावणी करणार आहे. ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने रिअल इस्टेटचे विधेयक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झाले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यामुळे बांधकाम क्षेत्रातील विश्वासार्हता वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुंबई, दिल्लीत बांधकाम परवाने आॅनलाईन
मुंबई आणि दिल्लीत आॅक्टोबरपासून सर्व बांधकाम परवाने आॅनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत.
By admin | Published: April 29, 2016 05:33 AM2016-04-29T05:33:38+5:302016-04-29T05:33:38+5:30