Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘रिअल इस्टेट’ व्यवहारांवर इंटरनेटचा मोठा प्रभाव

‘रिअल इस्टेट’ व्यवहारांवर इंटरनेटचा मोठा प्रभाव

भारतात ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रतील तब्बल 43 अब्ज डॉलरच्या व्यवहारांवर इंटरनेटचा प्रभाव असल्याचे नुकत्याच एका अभ्यासात उघड झाले आहे.

By admin | Published: June 20, 2014 12:22 AM2014-06-20T00:22:48+5:302014-06-20T00:22:48+5:30

भारतात ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रतील तब्बल 43 अब्ज डॉलरच्या व्यवहारांवर इंटरनेटचा प्रभाव असल्याचे नुकत्याच एका अभ्यासात उघड झाले आहे.

Big impact on internet on 'real estate' transactions | ‘रिअल इस्टेट’ व्यवहारांवर इंटरनेटचा मोठा प्रभाव

‘रिअल इस्टेट’ व्यवहारांवर इंटरनेटचा मोठा प्रभाव

>मुंबई : भारतात ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रतील तब्बल 43 अब्ज डॉलरच्या व्यवहारांवर इंटरनेटचा प्रभाव असल्याचे नुकत्याच एका अभ्यासात उघड झाले आहे. मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी लोक इंटरनेटवरून माहिती घेतात आणि त्यानंतर खरेदीचा व्यवहार निश्चित करतात, असे हे सव्रेक्षण सांगते. 
स्थावर मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी इंटरनेटवरून त्याची माहिती घेणा:यांच्या संख्येत देशात सातत्याने वाढ होत आहे. साधारणपणो ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रची माहिती घेणा:यांमधील 55 टक्के लोक इंटरनेटवरील माहितीवर संबंधित मालमत्तेचा दर्जा आणि किंमत ठरवितात. त्यानंतर ते संबंधित फ्लॅट किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे निश्चित करतात, असे गुगल इंडियाच्या एका सव्रेक्षणात आढळले आहे.
विविध वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून मालमत्ता खरेदीचे 55 टक्के निर्णय घेतले जातात. विशेष म्हणजे त्यातून होणारी उलाढाल थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 43 अब्ज डॉलर एवढी असल्याचा निकर्ष या अभ्यासात काढण्यात आला आहे. 
देशातील 15 महानगरांमध्ये घेतलेल्या ऑफलाईन सव्रेक्षणात मालमत्ता खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या 6,क्क्क् लोकांना विविध प्रश्न विचारण्यात आले.   (प्रतिनिधी) 
 
474 टक्के ‘ऑनलाईन सर्च’ घर खरेदीसाठी करण्यात येतात. तर इंटरनेटवरील 26 टक्के ‘सर्च’ भाडय़ाने घर घेण्यासाठी करण्यात येत असल्याचे सव्रेक्षणात आढळले. 
4 जयपूर, नागपूर, पुणो, चंदीगडसारख्या महानगरांमध्ये इंटरनेटवरून ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रची माहिती घेणा:यांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. मात्र विविध कंपन्यांच्या वेबसाईटवरील माहिती परिपूर्ण नसल्याचे लोकांचे म्हणणो आहे. 

Web Title: Big impact on internet on 'real estate' transactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.