lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > एअर इंडियाला १५00 कोटींचे कर्ज

एअर इंडियाला १५00 कोटींचे कर्ज

सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी एअर इंडियाला बँक ऑफ  इंडियाकडून दररोजच्या भांडवली खर्चासाठी १५00 कोटी रुपयांचे कर्ज  मिळाले आहे. दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निविदा काढल्यानंतर एक  महिन्याच्या आत हे कर्ज मिळाले आहे.      

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 02:22 AM2017-11-13T02:22:30+5:302017-11-13T02:28:00+5:30

सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी एअर इंडियाला बँक ऑफ  इंडियाकडून दररोजच्या भांडवली खर्चासाठी १५00 कोटी रुपयांचे कर्ज  मिळाले आहे. दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निविदा काढल्यानंतर एक  महिन्याच्या आत हे कर्ज मिळाले आहे.      

Air India loans up to Rs 1500 crore | एअर इंडियाला १५00 कोटींचे कर्ज

एअर इंडियाला १५00 कोटींचे कर्ज

Highlightsबँक ऑफ इंडियाचे सहकार्य ‘टेक ऑफ’साठी बूस्टर

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी एअर इंडियाला बँक ऑफ  इंडियाकडून दररोजच्या भांडवली खर्चासाठी १५00 कोटी रुपयांचे कर्ज  मिळाले आहे. दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निविदा काढल्यानंतर एक  महिन्याच्या आत हे कर्ज मिळाले आहे.             
अलीकडच्या काही महिन्यांत एअर इंडियाला सार्वजनिक बँकांकडून  मिळालेले हे दुसरे कर्ज आहे. यापूर्वी पंजाब नॅशनल बँक आणि इंडसइंड  बँकेकडून ३,२५0 कोटी रुपयांचे कर्ज मिळाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहि तीनुसार, ते कर्जही दररोजचा भांडवली खर्च करण्यासाठी मिळाले होते.               
एअर इंडिया सध्या आपले कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. यात  व्यवसायाच्या संचालनासाठी उपयोग नसलेल्या संपत्तीची (नॉन कोअर  असेट) विक्री करण्यावरही विचार सुरू आहे. एअर इंडियाने १८ ऑक्टोबर  रोजी एका निविदेद्वारे सरकारी हमी असलेल्या कर्जाची मागणी केली होती.  त्यानंतर, बँक ऑफ इंडियाने १५00 कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. गत तीन  महिन्यांत बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेने एयरलाइनला कर्ज  दिले आहे. 

५0 हजार कोटींच्या कर्जाचे ओझे 
आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या सध्या एअर इंडियावर ५0 हजार  कोटींचे कर्ज आहे. यूपीए सरकारने २0१२ मध्ये ‘बेलआउट’पॅकेजअंतर्गत  एअर इंडियाला पॅकेज दिले होते. सार्वजनिक क्षेत्रातील मोठी कंपनी म्हणून  ओळखली जाणारी एअर इंडिया ४४ विदेशी आणि ७५ देशांतर्गत उड्डाणे  करते. अन्य विदेशी शहरात कोपेनहेगन, टोकियो, वॉशिंग्टन, स्टॉकहोम,  सिडनी, हाँगकाँग, काबूल, कोलंबो, सिंगापूर आणि लंडन शहरासाठीही  एअर इंडियाची सेवा आहे.  

निगरुंतवणुकीपूर्वी व्हीआरएस 
एअर इंडियाच्या निगरुंतवणुकीची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. या  चर्चेसोबतच या कर्मचार्‍यांच्या स्वेच्छा नवृत्तीबाबतही चर्चा होत आहे. निगरुं तवणुकीपूर्वी व्हीआरएसची योजना अंमलात आणायची आहे. 
एअर इंडियात सेवानवृत्तीची वयोर्मयादा ५८ वर्षे आहे. सहायक कंपन्यांसह  कर्मचारी संख्या २२ हजार आहे. यात एअर इंडियाचे १२ हजार कर्मचारी  आहेत. त्यात ८९७ पायलट, २,७५0 चालक दल कर्मचारी आहेत. 

Web Title: Air India loans up to Rs 1500 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.