lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुंबईत आले अफगाणी सफरचंद

मुंबईत आले अफगाणी सफरचंद

भारत-अफगाणिस्तानदरम्यान हवाई कार्गो कॉरिडॉरची सुरुवात मुंबईतून झाली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 03:45 AM2017-12-30T03:45:07+5:302017-12-30T03:45:18+5:30

भारत-अफगाणिस्तानदरम्यान हवाई कार्गो कॉरिडॉरची सुरुवात मुंबईतून झाली आहे.

Afgani apple came to Mumbai | मुंबईत आले अफगाणी सफरचंद

मुंबईत आले अफगाणी सफरचंद

चिन्मय काळे 
मुंबई : भारत-अफगाणिस्तानदरम्यान हवाई कार्गो कॉरिडॉरची सुरुवात मुंबईतून झाली आहे. गुरुवारी सायंकाळी काबूलहून अफगाणी सफरचंदची पहिली खेप मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील वार्षिक व्यापार सध्या ३५ कोटी डॉलरचा आहे. तीन वर्षांत १ अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अफगाण दौ-यादरम्यान राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्याशी केलेल्या चर्चेत घेण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव व तेथील उप राष्ट्राध्यक्ष दानीश सरवार यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले.
एअरबस ३३० जातीचे कार्गो विमान काबूलहून ४० टन अफगाणी सफरचंद घेऊन आले. त्यानंतर २० टन भारतीय केळी आणि २० टन टोमॅटो या विमानाने काबूलला रवाना करण्यात आले. महाराष्ट्राचे प्रधान
सचिव, अफगाणिस्तान कॉन्सिलेट जनरलमधील उच्चाधिकारी आदींनी या पहिल्या विमानाचे स्वागत केले.
>दरवर्षी १० लाख टनांची आयात
भारतात दरवर्षी २२ लाख टन सफरचंदाची मागणी असते. पाच राज्यांत जवळपास १२ लाख टन सफरचंदांचे उत्पादन होते. उर्वरित १० लाख टन सफरचंद आयात होतात. मात्र त्यापैकी जवळपास ७० टक्के सफरचंदांची आयात केवळ अमेरिकेतून होते, हे विशेष.

Web Title: Afgani apple came to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.