lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > २१२० कोटींच्या २४ मालमत्तांचा एकाच वेळी लिलाव

२१२० कोटींच्या २४ मालमत्तांचा एकाच वेळी लिलाव

पॅनकार्ड क्लब घोटाळ्यातील गुंतवणूकदारांची ३० टक्के रक्कम मोकळी होण्याची चिन्हे आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:40 AM2018-04-10T00:40:06+5:302018-04-10T00:40:06+5:30

पॅनकार्ड क्लब घोटाळ्यातील गुंतवणूकदारांची ३० टक्के रक्कम मोकळी होण्याची चिन्हे आहेत.

24 auctions of 2120 crores auctioned at the same time | २१२० कोटींच्या २४ मालमत्तांचा एकाच वेळी लिलाव

२१२० कोटींच्या २४ मालमत्तांचा एकाच वेळी लिलाव

मुंबई : पॅनकार्ड क्लब घोटाळ्यातील गुंतवणूकदारांची ३० टक्के रक्कम मोकळी होण्याची चिन्हे आहेत. या कंपनीने राज्यातील ३५ लाख व देशभरातील एकूण ५० लाख गुंतवणूकदारांची ७०३५ कोटींची फसवणूक केली होती. या कंपनीच्या आता २१२० कोटी रुपयांच्या २४ मालमत्तांचा ‘सेबी’कडून ९ मे रोजी लिलाव होत आहे.
सुधीर मोवारकर (दिवंगत), विद्या मोवारकर, ज्ञानराज मोवारकर, सिद्धार्थ मोवारकर, शोभा बरडे, उषा तारी, मनिष गांधी, चंद्रसेन भिसे व रामचंद्रन रामकृष्णन यांनी पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या नावे गुंतवणूकदारांकडून १९९७ पासून पैसे गोळा केले. भक्कम परताव्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवण्यात आले होते. काही जणांना २०१४ पर्यंत परतावा मिळाला पण नंतर मिळणे बंद झाल्याने प्रकरण ‘सेबी’कडे गेले. ‘सेबी’ने कंपनीचा समावेश घोटाळ्यांच्या श्रेणीत करून ८४ मालमत्ता जप्त केल्या आहेत.

Web Title: 24 auctions of 2120 crores auctioned at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.