lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > क्रेडिट कार्डच्या संख्येत मोठी वाढ, रिझर्व्ह बँक अहवाल; तक्रारींत मात्र ५ टक्के घट

क्रेडिट कार्डच्या संख्येत मोठी वाढ, रिझर्व्ह बँक अहवाल; तक्रारींत मात्र ५ टक्के घट

यंदाच्या वर्षात वापरातील के्रडिट कार्डांची संख्या तब्बल ५0 लाखांनी वाढली आहे, असे असले तरी क्रेडिट कार्डांविषयीच्या तक्रारीत मात्र ५ टक्के घट झाली. बँकिंग क्षेत्रातील एकूण तक्रारींचे प्रमाण २७ टक्क्यांनी वाढले असताना क्रेडिट कार्डविषयक तक्रारी घटल्या आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:44 AM2017-12-22T01:44:54+5:302017-12-22T01:45:17+5:30

यंदाच्या वर्षात वापरातील के्रडिट कार्डांची संख्या तब्बल ५0 लाखांनी वाढली आहे, असे असले तरी क्रेडिट कार्डांविषयीच्या तक्रारीत मात्र ५ टक्के घट झाली. बँकिंग क्षेत्रातील एकूण तक्रारींचे प्रमाण २७ टक्क्यांनी वाढले असताना क्रेडिट कार्डविषयक तक्रारी घटल्या आहेत.

 A large increase in credit card numbers, RBI report; Complaints decrease by 5% | क्रेडिट कार्डच्या संख्येत मोठी वाढ, रिझर्व्ह बँक अहवाल; तक्रारींत मात्र ५ टक्के घट

क्रेडिट कार्डच्या संख्येत मोठी वाढ, रिझर्व्ह बँक अहवाल; तक्रारींत मात्र ५ टक्के घट

मुंबई : यंदाच्या वर्षात वापरातील के्रडिट कार्डांची संख्या तब्बल ५0 लाखांनी वाढली आहे, असे असले तरी क्रेडिट कार्डांविषयीच्या तक्रारीत मात्र ५ टक्के घट झाली. बँकिंग क्षेत्रातील एकूण तक्रारींचे प्रमाण २७ टक्क्यांनी वाढले असताना क्रेडिट कार्डविषयक तक्रारी घटल्या आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या अहवालात ही माहिती आहे. बँकिंग लवादाकडे २0१६ मध्ये क्रेडिट कार्डांशी संबंधित ८,७४0 तक्रारी आल्या. एकूण तक्रारींच्या तुलनेत हे प्रमाण ८.५ टक्के होते. क्रेडिट कार्डच्या तक्रारींची संख्या २0१७ मध्ये ८,२९७ झाली असून, हे प्रमाण एकूण तक्रारींच्या तुलनेत ६.५ टक्के आहे. या वर्षात क्रेडिट कार्डांची संख्या २.४ कोटींवरून २.९ कोटींवर गेली आहे. कार्डांच्या संख्येत ५0 लाखांची वाढ दिसत आहे.

डेबिट कार्डांविषयी अधिक तक्रारी-
डेबिट कार्डांविषयीच्या तक्रारी मात्र १२.५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. या वर्षात सर्व कार्डांविषयी २४,७३१ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील १६,४३४ तक्रारी एटीएम/डेबिट कार्डांच्या आहेत. सर्वाधिक तक्रारी एटीएममधून पैसे न मिळणे किंवा कमी मिळणे या आहेत.

Web Title:  A large increase in credit card numbers, RBI report; Complaints decrease by 5%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.