४ महिन्यांत Zomato ची ही सेवा पुन्हा बंद

चार महिन्यांतच कंपनीनं ही सुविधा चुपचाप हटवलीये. जाणून घ्या कोणती आहे ही सेवा.

कंपनीनं ही सेवा सुरू करण्याचा दुसऱ्यांदा प्रयत्न केला होता. चार महिन्यांतच कंपनीनं ही सुविधा चुपचाप हटवलीये.

झोमॅटोनं १५ मिनिटात जेवण पोहोचवणारी क्विक सर्व्हिस तुर्तास बंद केली आहे. झोमॅटोने लाँचिंगनंतर अवघ्या चार महिन्यांतच ही सेवा आपल्या अॅपवरून हटवली. 

झोमॅटो अॅपच्या लँडिंग पेजवर या सेवेचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला होता, परंतु आता बंगळुरू, गुरुग्राम, हैदराबाद, मुंबई आणि इतर अनेक शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध नाही. 

यासंदर्भात कंपनीनं अधिकृतरित्या काहीही सांगितलेले नाही. झोमॅटो हे फीचर पूर्णपणे बंद करणार नाही आणि नंतर आणखी एडिशन जारी करू शकते, अशीही शक्यता आहे. 

या सेवेचा एक भाग म्हणून झोमॅटोने दोन किलोमीटरच्या परिघात निवडक रेस्टॉरंट्समधून रेडी टू ईट फूड उपलब्ध करून दिलं होतं.

झोमॅटोनं दुसऱ्यांदा क्विक सर्व्हिसमध्ये एन्ट्री केली होती. यापूर्वी २०२२ मध्ये लाँच झालेल्या झोमॅटो इन्स्टंटनं बंगळुरू आणि दिल्ली-एनसीआरमध्ये १० मिनिटांची डिलिव्हरी देण्याचं आश्वासन दिले होतं. 

परंतु जानेवारी २०२३ पर्यंत ही सेवादेखील बंद करण्यात आली. त्यानंतर झोमॅटो एव्हरीडेच्या माध्यमातून फूड सर्व्हिस दिली जात होती. मात्र, तो टॅबही आता अॅपवरून गायब झाला आहे.

Click Here