झोहराम ममदानी यांच्या पत्नी कोणत्या क्षेत्रात काम करतात?
न्यूयॉर्क महापौर पदाची निवडणूक झोहरान ममदानी जिंकले. डोनाल्ड ट्रम्प त्यांना विरोध करत असताना त्यांना जनतेने निवडले. आता लोक ममदानी यांच्याबद्दल लोक जाणून घेत आहेत.
ममदानी हे भारतीय वंशाचे आहेत. तर त्यांच्या पत्नीचे नाव रमा दुवाजी आहे. त्या कला क्षेत्रात आहेत. चित्रकार आणि ॲनिमेटर म्हणून त्या काम करतात.
रमा दुवाजी या सीरियन-अमेरिकन आहेत आणि त्यांचा जन्म अमेरिकेतील टेक्सासमध्ये झाला, पण त्यांचे बालपण दुबईमध्ये गेले.
रमा दुवाजी यांनी न्यूयॉर्कमधील स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्समधून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्या द न्यू यॉर्कर, द वॉशिंग्टन पोस्ट, बीबीसी यांसारख्या प्रसिद्ध संस्थांसाठीही काम करतात.
रमा दुवाजी यांनी पडद्याआड राहून झोहरान ममदानी यांच्या राजकीय प्रचारामध्ये, खासकरून त्यांच्या सोशल मीडिया, प्रचाराची योजना आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
रमा दुवाजी यांनी स्वतःला सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर ठेवलेलं आहे. त्यांनी व्हर्जिनियातील कॉमनवेल्थ विद्यापीठातून कम्युनिकेशन डिझाइनमध्ये पदवी मिळवली आहे.
झोहरान ममदानी आणि रमा दुवाजी यांची ओळख डेटिंग ॲपद्वारे झाली होती. डेट केल्यानंतर त्यांनी डिसेंबरमध्ये दुबईत लग्न केले.