झहीर खान - सागरिका घाटगेच्या बाळाची गोड झलक पाहिलीत का?
लग्नानंतर ८ वर्षांनी जोडप्याला पुत्रप्राप्ती
अभिनेत्री सागरिका घाटगे आणि माजी क्रिकेटर झहीर खान हे १६ एप्रिलला आईबाबा झाले. सोशल मीडियावरुन त्यांनी ही बातमी शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली.
पहिल्या पोस्टमध्येच सागरिकाने बाळाची पहिली झलक दाखवत दोन फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले होते. त्यानंतर आज तिने आणखी काही फोटो पोस्ट केले आहेत.
झहीर आणि सागरिका यांनी त्यांच्या बाळाचे नाव पहिल्याच दिवशी जाहीर केले होते. त्यांनी त्यांच्या बाळाचे नाव फतेहसिंह खान असे ठेवले असल्याचे सांगितले.
आज सागरिकाने तिचा आणि बाळाचा एक गोड फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोतील सागरिकाच्या चेहऱ्यावरील हास्य खूपच लोभसवाणे आहे.
"प्रेम, प्रार्थना आणि कृतज्ञतेच्या भावनेने आम्ही लाडक्या लेकाचं स्वागत करत आहोत", असं सागरिकाने पहिल्या पोस्टमध्ये म्हटलं होते. चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.
अभिनेत्री सागरिकाने २०१७ मध्ये झहीर खानशी लग्न केले होते. त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाल्यानंतर तब्बल ८ वर्षांनी त्यांच्या घरात लहानशा बाळाचे आगमन झाले.
वयाच्या ३९व्या वर्षी सागरिका घाटगे पहिल्यांदा आई झाली. तिने अतिशय आनंदाने तिचे स्वत:च्या बाळासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.