पत्नीही वाचवू शकते तुमचा टॅक्स

प्रत्येकाला आपल्या मेहनतीची कमाई अधिकाधिक वाचावी आणि कमीतकमी टॅक्स द्यावा लागावा असं वाटतं. 

प्रत्येकाला आपल्या मेहनतीची कमाई अधिकाधिक वाचावी आणि कमीतकमी टॅक्स द्यावा लागावा असं वाटतं. परंतु त्यासाठी काही योजना आखाव्या लागतात.

अनेक जण गुंतवणूक, विमा आणि टॅक्स सेव्हिंग योजनांच्या माध्यमातून टॅक्स बचत करतात. परंतु तुमच्या पत्नीच्या मदतीनं तुम्ही टॅक्स वाचवू शकता.

होम लोन घेणार असाल तर ते संयुक्तपणे घ्या. असं केल्यास मुद्दल परतफेडीवर १.५ लाख रुपयांपर्यंत आणि व्याजावर २ लाख रुपयांपर्यंत स्वतंत्र कर सवलतीचा दावा करू शकतात. 

हाऊस प्रॉपर्टीमध्ये जॉईंट नेम - उदाहरणार्थ, जर तुम्ही दोन्ही जॉइंट लोनवर टॅक्स बेनिफिट्स घेत असाल तर तुम्हाला एकूण ७ लाख रुपयांपर्यंत टॅक्स सूट मिळू शकते. 

तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या नावानं पीपीएफ खातं उघडून गुंतवणूक करा. जर तुम्ही दोन्ही खात्यांमध्ये १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला एकूण ३ लाख रुपयांपर्यंत टॅक्स बेनिफिट मिळेल.

नॅशनल पेन्शन सिस्टम - पत्नीच्या नावाने एनपीएस खातं उघडा. दोघेही आपापल्या खात्यात गुंतवणूक करू शकतात आणि ५०,००० रुपयांची अतिरिक्त कर वजावट घेऊ शकतात.

जोडीदार आणि कुटुंबासाठी आरोग्य विम्याचा हप्ता भरा. कलम ८० डी अंतर्गत पती-पत्नी दोघेही स्वतंत्र कर सवलतीचा दावा करू शकतात.

पत्नीच्या बचत खात्यावर व्याजदरात सवलत - पत्नीच्या नावानं स्वतंत्र बचत खातं उघडा. दोन्ही खात्यांना कलम ८० टीटीए अंतर्गत १०,००० रुपयांपर्यंतच्या व्याज उत्पन्नावर सूट मिळते.

Click Here