स्मार्टफोन ऐकतोय तुमचं खासगी बोलणं? प्रायव्हेसी धोक्यात

बऱ्याचदा मोबाईलमध्ये असे APP डाऊनलोड करता, ते तुमच्याकडून माइक्रोफोनचा एक्सेस मागतात

सध्याच्या आधुनिकतेच्या काळात स्मार्टफोन लोकांच्या आयुष्याचा भाग बनला आहे. प्रत्येकासाठी मोबाईल गरजेचा झाला आहे

परंतु तो तुमचं खासगी बोलणं ऐकत असतो?, तुम्ही एखाद्या टॉपिकवर बोलला आणि काही वेळाने तेच तुमच्या मोबाईलमध्ये दिसले हे तुम्हालाही जाणवले आहे का?

याचे कारण म्हणजे, तुम्ही अनेक APP डाऊनलोड करता आणि त्यात न वाचता मायक्रोफोन अ‍ॅक्सेसची परवानगी दिली असेल

काही Apps तुमचे संभाषण गपचूप रेकॉर्ड करू शकतात. त्यातून युझर्सचा स्वभाव, आवडी-निवडी आणि अगदी लोकेशनही ट्रॅक केले जाऊ शकते.

काही App बॅकग्राउंडमध्ये चालतात आणि डेटा गोळा करतात. ही माहिती थर्ड पार्टीला पाठवली जाते. ज्याचा जाहिरात आणि मार्केटिंगमध्ये वापर करतात.

कोणतेही Unknown APP इन्स्टॉल करणे टाळा आणि ते APP नेहमी Play Store and Apple Store वरूनच डाउनलोड करा

फोनमधील सेटिंगमध्ये जाऊन App ला जी माइक्रोफोन, कॅमेरा, लोकेशन अथवा स्टोरेजबाबत परमिशन दिली आहे. ती तात्काळ बंद करा

Click Here