तुमचं नक्की मानसिक वय किती?

प्रत्येकाला आपल्याला शारीरिक वय माहित असतं. आपलं मानसिक वयही असतं, त्या मानसिक वयाची वाढ हाेत असते. त्या वयाप्रमाणे आपण वागत असताे, हे माहिती आहे का तुम्हाला ?

बालपण ० ते ६ वर्षे. या वयात फक्त खेळ आणि कुतूहल असतं. यात भावनिक आधार खूप महत्त्वाचा असताे. प्रेम, सुरक्षितता मिळाली तर वाढ चांगली हाेते. 

वय वर्षे ७ ते १२. मी हे करू शकताे. हा आत्मविश्वास या वयातच तयार हाेताे. नवीन गाेष्टी शिकणं, शिस्त आणि काैशल्य शिकण्याचे हेच वय असतं. 

किशाेरवयीन अवस्था १३ ते १८ वर्षे. एकीकडे स्वतःचा शाेध घेत असताना गाेंधळलेल्या स्थितीत असताे. स्वतःची ठाम मत असतात, बंडखाेरीला सुरूवात हाेते. 

तरूणपणात म्हणजे १९ ते ३० वर्षांमध्ये स्थिरता येते. मन स्थिर असतं पण दबावही असताे. कारण, याच काळात, करिअर, प्रेम, लग्न असे महत्त्वाचे टप्पे पार पडतात.

प्रौढत्वाची सुरूवात तिशीनंतर हाेते. कुटुंब, जबाबदाऱ्या स्वतःपेक्षा इतरांना प्राधान्य देण्याचा काळ. यामुळे स्वत्व हरवताेय का? ही भीती, गाेंधळ सुरू असताे. 

वय वर्षे ४६ ते ५९ मध्ये मन अधिक खाेल विचारात गुंतत जातं. जीवनाकडे एकदा नव्याने पाहायला लागताे. काय गमावलं? काय कमावलं? याची गणिते मांडताे. 

वयाच्या ६० नंतर  निवृत्तीचा काळ येताे. काही जबाबदाऱ्यातून मुक्त हाेताे, काही नवीन जबादाऱ्या येतात. सगळं आयुष्य पूर्णपणे बदलत असताना मन शांत असतं. 

तुम्ही आता काेणत्या मानसिक वयाच्या टप्प्यात आहात? काेणता टप्पा राहून गेला, काेणत्या वयाच्या टप्प्यात अडकला, स्वतःला शाेधा. 

Click Here