माेबाईल ही एक जीवनावश्यक वस्तू झाली आहे. पावसाळ्यात माेबाईल भिजलाच तर जीव घाबराघुबरा हाेताे. पण, आता टेन्शन घेऊ नका.
पावसाळ्यात अनेकांचे फाेन भिजतात. अनेकदा घाई गडबडीत माेबाईल हातातून पाण्यात पडताे. भिजल्यावरही माेबाईल चांगला राहण्यासाठी हे उपाय आहेत.
स्मार्ट फाेन भिजला तरीही घरच्या घरी ताे नीट करता येऊ शकताे. त्यासाठी फक्त 'या' गाेष्टी तुम्हाला करायच्या आहेत.
माेबाईल भिजला तर सर्वात आधी माेबाईल स्विच ऑफ करा. माेबाईल ऑन ठेवल्यास प्राेब्लेम वाढू शकता.
माेबाईल भिजला असताना चार्ज करण्याची चूक मुळीच करू नका. ओला असताना चार्जिंग केल्यास बॅटरी खराब हाेऊ शकते.
माेबाईल बाहेरून पुसून काेरडा करून घ्या. त्यानंतर एअर टाइट डब्यात तांदुळ घालून त्यात २४ ते ४८ तासांसाठी माेबाईल बंद करून ठेवा.
तुमच्याकडे सिलीका जेलची पाकीट असतील ती पाकीट ठेवून त्यात माेबाईल ठेवावा. त्या पाकींटामुळे माेबाईलमधली आर्द्रता शाेषली जाते.
हे उपाय करून माेबाईल नीट सुरू झाला नाही. तर, तसाच न वापरता कंपनीच्या माेबाईल सेंटरला माेबाईल दाखवा.