एखाद्या व्यक्तीला जांभई आली की, त्या व्यक्तीला झाेप आली आहे, आळस भरला आहे, असे तुम्हाला वाटते का? हा समज चुकीचा आहे.
मिटींगमध्ये, क्लासरूममध्ये काेणी जांभई दिली की, सगळेजण त्या व्यक्तीकडे जरा विचित्र नजरेने बघतात. पण, जांभई मागचं विज्ञान माहिती आहे का?
जांभई म्हणजे झाेप, कंटाळा असा सर्वसामान्य समज आहे. पण, जांभई आपल्याला जागं, ताजेतवाने आणि निरोगी ठेवते.
संशोधनानुसार जांभई देताना, ताेंड उघडल्यावर शरीरात थंड हवा आत जाते. यामुळे मेंदूचं तापमान कमी होतं आणि मेंदू सतर्क राहताे.
जांभईमुळे फुफ्फुसात जास्त हवा भरते, रक्तात ऑक्सिजन वाढतो आणि कार्बन डायऑक्साइड कमी होतो.
शरीर थकलं की, मेंदू देखील पाॅवर सेव्हिंग माेड ऑन करताे. मेंदू उर्जा वाचवताे, विश्रांतीची सूचना देताे. जांभईद्वारे शरीराला ही सूचना दिली जाते.
Contagious yawn म्हणजे दुसऱ्याला जांभई आली की आपल्यालाही येते. हे empathy आणि social bonding शी जोडलेलं आहे.
कुत्रे, मांजर, सिंह यांनाही जांभई येते. कधी रिलॅक्ससाठी ते जांभई देतात. तर कधी गटात dominance दाखवण्यासाठी.
जांभई दिल्याने मेंदू ताजातवाना हाेताे, लक्ष केंद्रित करण्यास मदत हाेते आणि तणाव कमी हाेण्यास मदत हाेते.
बर्याच लोकांचा गैरसमज आहे की, जांभई आली म्हणजे आळस. पण ती प्रत्यक्षात शरीराची वैज्ञानिक प्रक्रिया आहे.
जांभई कमी करण्यासाठी खाेल श्वास घ्या, थाेडं पाणी प्या, स्ट्रेचिंग करा यामुळे जांभई येणं कमी हाेईल. मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळेल.