..अन् ४ 'कॅच ड्रॉप'सह यशस्वीच्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

याआधी अजिंक्य रहाणेनं एका कसोटी सामन्यात सोडले होते सर्वाधिक झेल 

इंग्लंड विरुद्धच्या हेडिंग्ले कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालनं पहिल्या डावात शानदार शतक झळकावले.

पण फिल्डिंग वेळी खराब कामगिरीसह त्याने इंग्लंडच्या दोघांच्या शतकी खेळीला हातभार लावला. हेच टीम इंडियाच्या पराभवाचं एक प्रमुख कारणही ठरले.

यशस्वी जैस्वाल याने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ३ कॅच सोडले.

दुसऱ्या डावात तो फलंदाजीत अपयशी ठरलाच. पण पुन्हा त्याने बेन डकेटचा कॅचही सोडला. जो शतकी खेळीसह इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला.

ढिसाळ क्षेत्ररक्षणासह एका कसोटीत ४ कॅच सोडणारा यशस्वी हा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. 

शतकी खेळीनं इतिहास रचणाऱ्या यशस्वी जैस्वालच्या नावे एका टेस्टमध्ये सर्वाधिक कॅच सोडण्याच्या लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झालीये.

याआधी हा रेकॉर्ड अजिंक्य रहाणेच्या नावे होता. त्याने २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ३ कॅच सोडले होते. 

Click Here