त्याची फिफ्टी अन् तिची अदाकारी दोन्ही गोष्टी चर्चेत
लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात रंगलेल्या WTC फायनलमध्ये दुसऱ्या डावात मिचेल स्टार्कनं नाबाद अर्धशतकी खेळीसह छाप सोडली.
स्टार्कच्या बॅटिंग प्रमाणेच त्याची पत्नी आणि ऑस्ट्रेलियन वर्ल्ड चॅम्पियन क्रिकेटर एलिसा हेली हिची झलकही एकदम कडक होती.
लॉर्ड्सच्या मैदानातील स्टार्कच्या कडक बॅटिंगसह त्याला चीअर करताना स्टेडियमवर स्पॉट झालेल्या एलिसाची झलक चर्चेचा विषय ठरतीये.
याआधीही टीम इंडियाविरुद्धच्या WTC फायनलमध्ये तिचा स्टेडियम स्टँडमधील स्टायलिश अंदाज चर्चेचा विषय ठरला होता.
मिचेल स्टार्क आणि एलिसा हेली दोघेही क्रिकेटर आहेत. स्टायलिश लूकशिवाय कपल गोल सेट करणारी जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
कामगिरीशिवाय अनेकदा या जोडीच्या मैदानातील कमालीच्या केमिस्ट्रीनं सर्वांचे लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.
मिचेल स्टार्कही पत्नीच्या फायनल मॅच वेळी अगदी वेळ काडून तिला चीअर करताना दिसले आहे.