प्रेमात सगळं काही माफ नसतं, रक्ताने पत्र लिहाल तर जाल तुरुंगात!
रक्ताने पत्र लिहणे आहे गुन्हा, जाणून घ्या किती होते शिक्षा
अनेक सिनेमांमध्ये प्रियकर आपल्या प्रेयसीला रक्ताने पत्र लिहीत असल्याचे अनेक सीन आपण पाहिले आहेत.
अनेक प्रेमवीरांनी प्रत्यक्षातही रक्ताने पत्र लिहिण्याचा प्रकार केलाही आहे. मात्र, प्रेमात सगळं काही माफ असलं तरीदेखील रक्ताने पत्र लिहिणं माफ नाहीये.
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या रक्ताने पत्र लिहिलं तर तो कायद्याने गुन्हा असून त्यासाठी तुम्हाला चांगलीच शिक्षा मिळू शकते.
आपल्या रक्ताने पत्र लिहिण्याचा अर्थ एकप्रकारे एखाद्या व्यक्तीवर भावनिक दबाव निर्माण, धमकी देणे किंवा घाबरवणे असा होऊ शकतो. त्यामुळे हा कायद्याने गुन्हा आहे.
भारतीय न्याय संहितेनुसार, जर तुम्ही एखाद्या महिलेला रक्ताने पत्र लिहिलं तर तुमच्यावर कलम ७८ अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.
तुम्ही लिहिलेल्या पत्रामध्ये जर मृत्यूची धमकी, घातपात किंवा अन्य कोणती धमकी असेल तर हा गुन्हा असून त्यासाठी ७ वर्षाची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात येतो.
जर एखाद्या सरकारी कर्मचारी, संस्था किंवा सरकारी अधिकाऱ्याला तुम्ही रक्ताने पत्र पाठवलं तर तुमच्यावर कलम २२६ अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.
तुमच्या घराखाली तेलाची विहीर तर नाही ना? कसा लावला जातो शोध