आपल्या आहारात असे काही पदार्थ आहेत ज्यामुळे आपली स्मरणशक्ती नकळतपणे कमी होत जाते.
केक, कोल्ड ड्रिंग्समध्ये सर्रास रिफाइंड शुगर वापरली जाते. परंतु, या अती गोड पदार्थाचा परिणाम व्यक्तीच्या स्मरणशक्तीवर होतो.
मैद्यापासून तयार केलेल्या पदार्थांमधून शरीराला कोणतेही पोषक घटक मिळत नाहीत. त्यामुळे ते शरीरासाठी फायद्याचेही नाहीत.
समोसा, बर्ग्स, चिप्स यांसारखे तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे ट्रान्स फॅट ब्रेन सेल्सची हानी होते. ज्यामुळे मेमरी लॉस सारखी समस्या निर्माण होऊ शकते.
प्रोसेस्ड मीटमध्ये मोठ्या प्रमाणावर सोडियम आणि प्रिझर्वेटिव्हस असतात. ज्यामुळे मेंदूचं आरोग्य बिघडू शकतं.
अतिरिक्त प्रमाणात मीठाचं सेवन केल्यामुळे मेंदूची गती स्लो होते.