जगात या ठिकाणी माेबाईल असताे नाॅट रिचेबल

आजच्या काळात जगात अशी ठिकाणं आहेत, जिथे माेबाईल नाॅट रिचेबल आहे, असे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. 

पण, आजही जगात असे भाग आहेत, जे पूर्णतः Silent Zones आहेत. तिथे माेबाईलला रेंज नाही, ध्वनी लहरी पाेहचत नाहीत. 

भौगोलिक रचना, चुंबकीय क्षेत्र, मानव निर्मित नियमांमुळे Sound waves, Radio waves पोहोचू शकत नाहीत, अशा भागांना Silent Zones म्हणतात. 

अमेरिकेच्या व्हर्जिनिया आणि वेस्ट व्हर्जिनिया राज्यात ३४,००० चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. जिथे मोबाईल, Wi-Fi, रेडिओ सिग्नल्सवर बंदी आहे.

Green Bank Telescope रेडिओ टेलिस्कोप आहे, तिथे बाहेरील सिग्नल्सचा व्यत्यय नको,म्हणून संपूर्ण क्षेत्रच Silent ठेवलेलं आहे.

या भागात राहणारे लाेक मोबाईल वापरू शकत नाहीत. रेडिओ, मायक्रोवेव्ह ओव्हन, Wi-Fi – सगळ्याच्या वापरावर मर्यादा आहेत.

Orfield Laboratories, Minnesota येथे जगातली सर्वात शांत खाेली म्हणजे Anechoic Chamber आहे. 

या खोलीत आवाज इतका कमी आहे की, स्वतःच्या हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, फुफ्फुसांचा आवाज ऐकू येतो. कोणीही इथे जास्त वेळ राहू शकत नाही!

नैर्सगिक Silent Zones मात्र डोंगराळ भागात, दऱ्यांमध्ये किंवा जंगलात अनुभवता येतात. जिथे माेबाईल रेंज सहज पाेहचत नाही.

Click Here