जगातील निडर प्राणी!  सापाच्या विषाचाही होत नाही त्याच्यावर परिणाम

हा प्राणी वाघ, चित्ता, जंगली कुत्रे, साप यांसारख्या प्राण्यांचा बिनधास्तपणे सामना करतो. 

भूतलावर अनेक विविध प्राणी आहेत. यात प्रत्येकाची काही ना काही वैशिष्ट्येही आहेत. यातलाच एक असा प्राणी आहे ज्याच्यावर कोणत्याही विषाचा परिणाम होत नाही.

साधारणपणे, साप, विंचू चावला की माणूस किंवा प्राणी यांचा मृत्यू होतो. परंतु, या प्राण्यावर विषाचाही परिणाम होत नाही. इतकंच नाही तर वाघ, सिंहदेखील त्याच्या वाट्याला जात नाही.

गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्सने हनी बँजर या प्राण्याला सर्वात निडर प्राणी म्हणून पुरस्कृत केलं आहे. हनी बँजर हा वाघ, चित्ता, साप यांचा बिनधास्तपणे सामना करतो. इतकंच नाही तर त्यांच्यावर हल्ला करतो

हनी बँजर हा कोब्रा, पफ एडर यांसारख्या विषारी प्राण्यांची शिकार करतात आणि त्यांचं भक्षण करतात. विशेष म्हणजे या प्राण्यांच्या विषाचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.

विषारी साप हनी बँजरला चावला तर फारफार तर तो सुस्त होतो. परंतु, तो मरत नाही.हनी बँजरची त्वचा ही जाड रबरासारखी असते. त्यामुळे त्याच्यावर कोणत्याही दंशाचा परिणाम होत नाही.

सहारा वाळवंट एकेकाळी होतं हिरवगार जंगल?

Click Here