बोईंग 787 ड्रीमलायनर विमानात काय आहेत फिचर 

बोईंग 787 ड्रीमलायनर हे जगातील सर्वोत्तम प्रवासी विमान मानले जाते.

अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलाइनर गुरुवारी कोसळले. या अपघातात १२ क्रू मेंबर्ससह २४१ जणांचा मृत्यू झाला.

बोईंग 787 ड्रीमलायनर हे जगातील सर्वोत्तम प्रवासी विमान मानले जाते. ते लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी डिझाइन केलेले आहे.

अमेरिकन कंपनी बोईंग हे विमान बनवते. त्याच्या हलक्या आणि मजबूत संमिश्र रचनेमुळे, ते मागील मॉडेल बोईंग 767 पेक्षा २५ टक्के कमी इंधन वापरते.

जगभरातील प्रत्येक मोठी विमान कंपनी ही विमाने वापरत आहे, या मागचे कारण इंधन कमी वापरते हेच आहे.

बोईंग 787 ड्रीमलायनर एकावेळी १३,५३० किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकते. हे विमान २००-२५० प्रवासी घेऊन जाऊ शकते.

या विमानात दोन इंजिन बसवले आहेत, त्यापैकी एक रोल्स-रॉइस ट्रेंट 1000 आणि दुसरे जनरल इलेक्ट्रिक (GEnx-1B) आहे. ही इंजिने खूप कमी आवाज करतात.

विमानाची लांबी ५६ मीटर, उंची १७ मीटर आणि पंखांची रुंदी ६० मीटर आहे.

बोईंग 787 ड्रीमलायनर विमानाचा कमाल वेग ताशी ९५४ किलोमीटर आहे.

हे विमान जास्तीत जास्त ५०२,५०० पौंड (२२७,९३० किलोग्रॅम) वजन वाहून नेऊ शकते.

Click Here