पाहा अशी आश्चर्यकारक गावं...
जगात काही ठिकाणी सूर्य सलग २४ तास किंवा महिन्याभरही मावळत नाही... पाहूया अशीच आश्चर्यकारक ७ गावं !!
बारो (नॉर्वे)येथे मे महिन्यात सूर्य उगवला की जुलैपर्यंत सुमारे ६० दिवस मावळतच नाही. लोकांनी 'काळी खोली' करून झोपायची सोय ठेवलेली असते.
लॉन्गयरबेन (नॉर्वे)येथे मे महिन्यापासून ऑगस्टपर्यंत रात्रच होत नाही! आर्क्टिक सर्कलच्या जवळ असलेलं हे गाव पूर्णवेळ उजेडातच असतं.
टुकटॉयाक्टुक (कॅनडा)येथे जुलैमध्ये ३० दिवस अखंड प्रकाश असतो. उत्तर कॅनडामधील हे गाव अशा हवामानामुळे प्रसिद्ध आहे.
मुरमान्स्क (रशिया)हे आर्क्टिक सर्कलच्या उत्तरेचे जगातील सर्वात मोठे शहर आहे. येथे मे अखेरपासून सलग २ महिने सूर्य मावळत नाही.
इस्फॉर्ड (नॉर्वे)येथे सुमारे ३ महिन्यांचा 'Midnight Sun' म्हणजेच मध्यरात्रीही सूर्य असतो. येथे ३ महिने रात्री १२ वाजताही आकाशात प्रखर सूर्य पाहायला मिळतो.
युकोन (कॅनडा)हे गाव 'Land of the Midnight Sun' नावाने ओळखले जाते. येथे उन्हाळ्यात सलग ५५ दिवस उजेड असतो.
स्वालबार्ड (नॉर्वे)येथे एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात एकही रात्र नसते. आर्क्टिक सर्कलमधील हे गाव जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतं.