१ वर्षापेक्षा लहान मुलांना हृदयाशी संबंधित तक्रारी असण्याची काही लक्षण आहेत.
सध्याच्या काळात हृदयविकार ही मोठी समस्या झाली आहे. अगदी लहान मुलांमध्येही हा त्रास सध्या दिसून येत आहे.
गेल्या काही काळात हृदयविकाराच्या झटक्याने लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
काही ठराविक लक्षणांवरुन एखाद्या व्यक्तीला हृदयासंबंधित तक्रारी आहेत हे ओळखता येतं. परंतु, लहान मुलांमधील ही समस्या कशी ओळखायची.
१ वर्षापेक्षा लहान मुलांना हृदयाशी संबंधित तक्रारी असण्याची काही लक्षण आहेत ती पाहुयात.
जर १ वर्षापेक्षा लहान बाळाला हृदयासंबंधित तक्रारी असतील तर ते बाळ दूध पितांना लगेच थकून जातं.
लहान बाळ जोरजोरात श्वासोच्छवास घेत असेल किंवा त्याचे ओठ- नखं निळे पडत असतील तर त्याला एकदा डॉक्टरांकडे नक्की घेऊन जा.
वारंवार छातीत इन्फेक्शन होणे किंवा खेळतांना लगेच थकून जाणे हे सुद्धा हृदयाशी निगडीत समस्या असल्याचं लक्षण आहे.