जगातला पहिला इमोजी कोणी आणि कधी बनवला?
इमोजी हे डिजिटल जगाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. १७ जुलै हा दिवस 'वर्ल्ड इमोजी डे' म्हणून साजरा केला जातो.
हसण्यासाठी, रडण्यासाठी, आपल्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण चॅटिंगमध्ये हमखास इमोजीचा वापर करतो.
जगातला पहिला इमोजी जपानच्या शिगेतका कुरीताने बनवला. तिने फक्त एक नाही तर तब्बल १७६ इमोजीचा ग्रुप बनवला.
शिगेतकाने १९९९ मध्ये पहिल्यांदा इमोजी डिझाईन केला. मोबाईल युजर्सना भावना व्यक्त करता याव्या यासाठी तिने इमोजी तयार केले.
१९९९ मध्येच जपानपासून इमोजीचा वापर सुरू झाला. नंतर हळूहळू हे इमोजी जगभरात लोकप्रिय झाले, त्याचा वापर वाढला.
'वर्ल्ड इमोजी डे'ची सुरुवात २०१४ मध्ये जेरेमी बर्ज नावाच्या व्यक्तीने केली. तेव्हापासून जगभरात हा दिवस साजरा केला जातो.