एअर हॉस्टेसची भूमिका खूप महत्वाची असते... पायलटपासून ते प्रवाशांपर्यंत...
अहमदाबादमधील एअर इंडियाच्या अपघातात महाराष्ट्रातील एअर हॉस्टेसचा मृत्यू झाला होता.
हे फिल्ड किती धोक्याचे आहे हे जरी माहिती असले तरी तरुणी एअर हॉस्टेस होण्यासाठी तयार असतात.
या एअर हॉस्टेसना विमानात काय काम असते, त्या काय काय करतात, त्यांना कोण ट्रेनिंग देते, याची माहिती घेऊया...
एअर हॉस्टेसचा कोर्स करावा लागतो, यासाठी अस्खलित इंग्रजी येणे बंधनकारक असते. मुंबई, पुण्यासह आता छोट्या शहरांतही अशा संस्था उपलब्ध आहेत.
कोणत्याही विमानात एअर हॉस्टेसची भूमिका खूप महत्वाची असते. ती प्रवाशांचे स्वागत, सुरक्षा, खानपान आणि निरोप या जबाबदाऱ्या पार पाडते.
प्रवासी विमानात आला की त्याचे स्वागत करून त्याला सीट कुठे आहे ते सांगणे किंवा तिथपर्यंत पोहोचविण्याचे काम करतात.
विमान उड्डाणापूर्वी त्या प्रवाशांना सुरक्षेचा डेमो देतात, विमानाचा आपत्कालीन दरवाजा कुठे आहे हे सांगतात. सीट बेल्ट, ऑक्सिजन मास्क याचीही माहिती देतात.
प्रवासात प्रवाशांना नाश्ता, जेवण देणे. पाणी, ब्लँकेट, औषध किंवा इतर विशेष विनंत्या ऐकणे.
प्रवाशाची तब्येत बिघडल्यास प्रथमोपचार देणे, आवश्यक असल्यास पायलटला कळविणे देखील करावे लागते.
विमान उड्डाणावेळी आणि उतरताना सीटबेल्ट, ट्रे टेबल बंद करणे, सामान व्यवस्थित ठेवले आहे का हे पाहण्याचे काम असते.