फ्लाइटमध्ये Male Attendant ला काय म्हणतात?

एअर होस्टेससोबतच विमानात पुरुष कर्मचारीदेखील असतात. मात्र, त्यांना काय म्हणतात हे अनेकांना माहित नसतं.

विमानाने प्रवास करतांना प्रवाशांच्या मदतीसाठी असणाऱ्या एअर होस्टेस तर सगळ्यांनाच ठावूक आहेत.

एअर होस्टेससोबतच विमानात पुरुष कर्मचारीदेखील असतात. मात्र, त्यांना नेमकं काय म्हणतात हे अनेकांना माहित नसतं.

आज आपण विमानात काम करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांना नेमकं काय म्हणतात ते समजून घेऊयात.

स्त्री-पुरुष समानता अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. यात एअरलाइन्समध्येही हाच नियम आहे. त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा त्याच्या कामाला ठराविक नावाचा टॅग न देता. सगळ्यांना एकाच नावाने संबोधलं जातं.

विमानात काम करणाऱ्या स्त्रियांनाही मुळात एअर हॉस्टेस म्हटलं जात नाही. त्यांच्यासाठी आणि पुरुष कर्मचाऱ्यांसाठी एकच पद आहे. ते म्हणजे फ्लाइट अटेंडेंट.

थोडक्यात काय तर, विमानात काम करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांना 'फ्लाइट अटेंडेंट' किंवा 'केबिन क्रू' असं म्हटलं जातं.

त्यामुळे जर तुम्ही कधी विमानाने प्रवास करत असाल तर तिथे काम करणाऱ्या स्त्री किंवा पुरुष यांना फ्लाइट अटेंडेंट असंच म्हणा.

स्माइल प्लीज! हसण्यामुळे अनेक विकार होतात दूर

Click Here