वयाची २१ वर्ष पार केलीत? मग प्रत्येक स्त्रीने केल्याच पाहिजेत या हेल्थ टेस्ट
प्रत्येक स्त्रीने केल्याच पाहिजेत या टेस्ट
महिला कायमच त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. परंतु, अशा काही हेल्थ टेस्ट आहेत, ज्या त्यांनी करणं गरजेचं आहे.
ब्रेस्ट चेकअप- महिलांनी वयाच्या २० व्या वर्षानंतर १-३ वर्षांत आवर्जुन ब्रेस्ट चेकअप करणं गरजेचं आहे.
मॅमोग्राफी- ४० ते ४५ या वयोगटातील स्त्रियांनी २-३ वर्षांमधून एकदा मॅमोग्राफी केली पाहिजे.
हाडांच्या घनतेची चाचणी - ६० आणि त्यावरील वयोगटातील महिलांनी आपल्या हाडांच्या घनतेची चाचणी आवर्जुन केली पाहिेजे.
क्लॅमिडिया आणि गोनोरिया चाचणी- २५ वर्षांखालील परंतु, लैंगिंकदृष्ट्या सक्रीय असलेल्या स्त्रियांनी ही चाचणी वर्षांतून एकदा नक्की करावी. तसंच २५ वर्षावरील स्त्रियांसाठीदेखील ही चाचणी उपयोगी ठरते.
किडनी स्टोन आहे? मग 'या' पदार्थांना चुकूनही लावू नका हात