काही ना काही कारणासाठी आपण पीएफमधून पैसे काढतो. पण आता हे पैसै काढताना काळजीपूर्वक काढावे काढावे लागणार आहेत.
काही ना काही कारणासाठी आपण पीएफमधून पैसे काढतो. पण आता हे पैसै काढताना काळजीपूर्वक काढावे काढावे लागणार आहेत. ईपीएफओनं एक मोठा इशारा दिलाय.
पीएफखातेधारकाने ठरवून दिलेल्या कारणाऐवजी दुसऱ्याच एखाद्या कारणासाठी भविष्य निर्वाह निधीमधील पैसे काढले तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
संबंधित व्यक्तीकडून ती रक्कम परत वसूल केली जाऊ शकते, असा इशारा ईपीएफओनं दिला आहे.
घर खरेदी किंवा बांधकाम, मुलांचे शिक्षण किंवा लग्न, आणीबाणीची वैद्यकीय परिस्थिती किंवा दीर्घकालीन बेरोजगारी, यांसारख्या कारणांसाठीच पीएफमधील पैसे काढण्याची परवानगी आहे.
खोट्या कारणासाठी पैसे काढले तर निवृत्तिवेतनात कपात होऊ शकते. यासाठी कर्मचारी आणि कंपनी या दोघांनाही जबाबदार ठरवलं जाऊ शकतं.
पीएफ भविष्यातील आर्थिक आधार असून तो वैद्यकीय विमा, आणीबाणीच्या परिस्थितीसाठी राखून ठेवावा.
Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंगस्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख